गारगोटी ( प्रतिनिधी ) –
लॉकडाऊन काळात कोणाची आर्थिक अडचण झाल्यास कोणी टोकाची भुमिका घेवू नका, अशा कठिण काळात एखाद्या बँकेने तगादा लावल्यास संघटनेशी तत्काळ संपर्क साधावा पण कोणत्याही परिस्थीतीत आत्महत्येचा विचार करू नका असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मंडप लायटनिंग डेकोरेशन असोसिएशनचे अध्यक्ष व कोल्हापूर महानगर पालिकेचे माजी महापौर सागर प्रल्हाद चव्हाण यांनी आरळगुंडी ता भुदरगड येथील विठ्ठल मंदिरात केले.ते येथील मंडप व्यावयासिक सदस़्य स्व. परशराम गोविंद पाटील वय ४९ यांच्या कुटुंबियांना आर्थिक हातभार लावण्यासाठी आयोजित केलेल्या दातृत्वाच्या कार्यक्रमात बोलत होते. आमदार प्रकाश आबिटकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या मंडप डेकोरेशनचे सदस्य स्व.परशरीम गोविंद पाटील यांनी लॉकडाऊन काळात झालेले मंडप डेकोरेशन चे कर्ज वेळेत परतफेड करू न शकल्याने नैराश्यातून आपले जीवन संपवले. या दु:खमय कुटुंबाला सावरण्यासाठी या कोल्हापूर जिल्हा मंडप लायटनिंग डेकोरेशन ने ८० हजार रुपयाची दोन दुभती जनावरे घेवून दिली तसेच त्यांच्या दोनही मुलांना शैक्षणिक साहित्य देवून त्यांना पुढील शिक्षणासाठी दत्तक घेतल्याचे जाहिर केले. आरळगुंडी येथील विठ्ठल मंदिराच्या सभाग्रहात संप्नन झालेल्या या कार्यक्रामत येथील ग्रामस्थ व सांप्रदायिक मंडळाचे सदस्य यावेळी भारावून गेले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून या कुटुंबास आर्थिक हातभार लावण्याचे आश्वासन दिले.भुदरगड तालुका मंडप डेकोरेशन असोसिएशन ही या कुटुंबास आर्थिक हातभार लावला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात म्हसवे च्या राधिका मंडप डेकोरेशन चे अध्यक्ष आंबादास देसाई यांनी कोणत्याही मंगल प्रसंगी कार्यक्रमास किमान २०० लोकांना परवाणगी देण्याकामी आमदार प्रकाश आबिटकर यांनी शासनाकडे पाठपुरावा कारावा अशी मागणी केली.
यावेळी कोल्हापरचे संघटना उपाध्यक्ष विनायक सुर्यवंशी, खजानीस सुनिल व्हनागडे, नियाज पटवेगार, कागल तालुका मंडप असोसिएशन चे अध्यक्ष दिपक मगर , भुदरगड तालुका अध्याक्ष बाजीराव शिंदे, उपाध्यक्ष शितल खैरे, अमित गुंड, दत्तात्रय परिट आदि संघटनेचे सदस्य, आरळगुंडी चे ग्रामस्थ व सांप्रदायिक मंडळ उपस्थीत होते.
मुख्यसंपादक
खूप छान काम
ImlSNGaLY