कोल्हापूर (प्रतिनिधी) :
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच इमारतीचे आज शाही समारंभात उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह न्यायालयीन आणि प्रशासकीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयत्नातून केवळ एका महिन्यात ऐतिहासिक इमारतीचे नूतनीकरण करून सर्किट बेंचसाठी सज्ज करण्यात आले. या परिसराचा कायापालट होऊन शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे.

1874 मध्ये बांधण्यात आलेल्या हेरिटेज इमारतीत डिव्हिजन बेंच, दोन सिंगल बेंच, रजिस्ट्रार कक्ष, वकिलांची कार्यालये, रेकॉर्ड रुम आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ऐतिहासिक राधाबाई बिल्डिंग मध्ये न्यायाधीश व सरकारी वकिलांसाठी लॉन्ज आणि कार्यालये सज्ज करण्यात आली आहेत.
सर्किट बेंचमुळे कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळणार असून वेळ, श्रम व खर्चाची बचत होणार आहे. शिक्षण, उद्योग, व्यापार आणि कायद्याच्या क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कामकाजाची वेळ :
सार्वजनिक सुट्टीखेरीज दररोज सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 पहिले सत्र, दुपारी 2.30 ते 4.30 दुसरे सत्र सुरू राहील.
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



