Homeघडामोडीआर्मी डे च्या निमित्ताने माजी सैनिकांचा सत्कार .

आर्मी डे च्या निमित्ताने माजी सैनिकांचा सत्कार .

आजरा ( प्रतिनिधी ) : आजरा येथील युवा सेना व शिवसेना वतीने आर्मी डे चे औचित्य साधून सेवानिवृत्त एसीपी नाईक सुभेदार संभाजी घाटगे यांचा दि. १७ रोजी सत्कार करण्यात आला. घाटगे १ जानेवारी रोजी. २४ वर्ष देश सेवा बजावत जम्मू काश्मीर येथील नवशेरा सेक्टर येथुन सुखरुप घरी पोहचले या आनंदाने महाराष्ट्रात प्रथमच सेवानिवृत्त सैनिकाची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. घाटगे यांचा तालुक्‍यात विविध स्तरावर सत्कार होत आहे.
यावेळी श्री. घाटगे यांनी तरुणांना आर्मी मध्ये भरती होण्यासाठी आजच्या युवापिढीने प्रयत्न केले पाहिजे. व्हाट्सअप फेसबुक सारख्या माध्यमाना तरुणांनी किती महत्त्व द्यावं हा विचार करून आपल्याला काय करायचा आहे. काय बनायचं आहे आपल्या आई – वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी व्यायाम, अभ्यास व शिक्षण याकडे लक्ष द्यावे. नियमित व्यायाम, रनिंग, केले पाहिजे. मी स्वतः मार्गदर्शन करण्यास मी वेळ देईन व आपण देशसेवेची भावना मनात ठेवून आजपासूनच आपण प्रयत्न केला तर यश निश्चित मिळेल.तसेच यावेळी आपल्याला आलेले अनुभव त्यांनी युवकांना शेअर केले. गावामध्ये या कल्पनेचे कौतुक होत आहे.
याप्रसंगी युवासेना व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी नितीन कातकर, अमोल देवेकर, सुरेश शिमणे, शुभम पाटील, शुभम मोहिते, प्रतिक कातकर, प्रतिक सुतार, वैभव कांबळे, रोशन कांबळे, पवण कांबळे ,संकेत घाटगे, भास्कर पाटील, सुशांत बाणेकर, ओंकार डोंगरे शिवसैनिक उपस्थित होते. आनंद येसने यांनी आभार मानले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular