Homeवैशिष्ट्येएक अविष्कार म्हणजे कविता….

एक अविष्कार म्हणजे कविता….

कविता म्हणजे उन्हात चांदण पडलेलं….
काल्पनिक जगातलं गाव मनात वसलेलं….

उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिलेलं….
आभासी जग सत्यात उतरवलेलं ….

कवीला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे कविता….
सरस्वतीने दिलेलं वरदान म्हणजे कविता….

कधी आक्रोश, कधी वेदना,
कधी प्रेरणा तर कधी सरणावरची नुसतीच राख
म्हणजे कविता…..

वाळवंनटात उमललेलं फुल म्हणजे कविता….
श्रावणाची चाहूल म्हणजे कविता….

विविध भावनाच्या सप्त सुरांना,
एकत्र गुमफून छेडलेली विणेची तार म्हणजे कविता….
एक दिव्य अनुभूती, एक अविष्कार म्हणजे कविता….

✍️ सुनीता खेंगले

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular