Homeघडामोडीएस .टी .कर्मचाऱ्यांच्या संपाला सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र , आजरा तालुका संघटनेचा...

एस .टी .कर्मचाऱ्यांच्या संपाला सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र , आजरा तालुका संघटनेचा पाठिंबा

आजरा(प्रतिनिधी)-: एस टी.महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात चालू असलेल्या संपला सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आजरा तालुक्याच्या वतीने पाठिंब्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांना देण्यात आले त्याची प्रत तहसीलदार विकास आहिर यांना सरपंच संघटनेचे आजरा तालुका पदाधिकारी यांनी दिले.

http://linkmarathi.com/अमेरिकेतील-हिंदू-समाज-मं/

तसेच आजरा अगर येथे जाऊन चालू असलेल्या संपाच्या स्थळी जाऊन संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला. एसटी ही ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या या रास्त आहेत, कोरोनामुळे सर्वांची परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. अश्या या हालाख्याच्या परिस्थिती ला कंटाळून 35 हुन अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत जी बाब खूप गंभीर आहे. शासनाने या गोष्टीची तात्काळ दखल घेत त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व संप मिटविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे काम चाल आहे ते तात्काळ थांबवावे. अशी कोणतीही कारवाई झाल्यास सरपंच संघटना कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरले असे आजरा तालुका सरपंच संघटनेचं अध्यक्ष संतोष बेलवाडे म्हणाले. यावेळी राज्यकार्यकारणी सदस्य राजू पोतनीस, जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी सरदेसाई, मार्गदर्शक मारुती मोरे सर, ऍड गुडुळकर, महेश कांबळे व इतर

http://linkmarathi.com/मिस-कॉल-करून-बँक-बॅलन्स-कस/

पदाधिकारी उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular