Homeघडामोडीकलामहोत्सवातआजरा हायस्कूल आजराचा आर्यन कांबळे(भुमिका अभिनयात) राज्यात प्रथम

कलामहोत्सवातआजरा हायस्कूल आजराचा आर्यन कांबळे(भुमिका अभिनयात) राज्यात प्रथम

आजरा (प्रतिनिधी )-:
येथील जनता एज्युकेशन सोसायटी, संचलित आजरा हायस्कूल आजरा च्या आर्यन तुकाराम कांबळे ने सादर केलेल्या शेतकरी आत्महत्या या एकपात्री नाटकांने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे नुकत्याच पुणे येथे पंडीत भीमसेन जोशी कलादालनात शालेय शिक्षण व साक्षरता विभाग,शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पुणे, औरंगाबाद, नागपूर या तीन विभागांमध्ये या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये आजरा हायस्कूल आजरा च्या लोकनृत्य, शास्त्रीय गायन, भुमिका अभिनय, व्दिमीतीय चित्रकला, कलाप्रकाराची जिल्हास्तरावरुन निवड झाली होती यामध्ये भुमिका अभिनय या कलाप्रकारांची 1जानेवारी ते 8जानेवारीला ओडिसा राज्यातील भुवनेश्वर येथे होणा-या राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यामुळे आजरा हायस्कूल आजरा ला महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल कु आर्यन तुकाराम कांबळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या नाटकांचे लेखन व दिग्दर्शन व्ही ए पोतदार,एस एस कालेकर यांनी केले तर मुख्याध्यापक शिवाजी येसणे उपमुख्याध्यापक बी एम दरी पर्यवेक्षक एस पी होलम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अशोक चराटी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ अनिल देशपांडे सचिव रमेशआण्णा कुरूणकर सर्व संचालक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे प्रोत्साहन मिळाले

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular