अमित गुरव -: मूळ गाव धुळे तिथेच जन्म आणि बालपण गेले. जेमतेम आठवी पर्यत शिक्षण झालं. तिचा जन्म होताच आई आणि तिला सोडून वडील बाजूला गेले. त्यामुळे तीच संगोपनाची जबाबदारी आई वरच होती .
आईचे आजारपण आणि घरची परिस्थिती यामुळे ती नृत्याकडे वळली . बालवयातच नृत्याची आवड निर्माण झाली त्याप्रमाणे तिचा क्लास पण सुरू होता. याच काळात अकलूज च्या लावणी महोत्सव मध्ये तिने पहिल्यांदा लावणी डान्स केला अन तिथेच खऱ्या अर्थाने तिला आपल्यातील कलागुणांना वाव मिळतो आहे याचा अंदाज येऊन 500 रुपये मानधन घेऊन आली. गौतमी ची आईचा अपघात झाल्यावर सर्व जबाबदारी तिच्यावर पडली आणि तिने कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. तिचे पुण्यात जास्त कार्यक्रम होत होते पण कोल्हापुरात प्रेक्षकांनी तिला जास्तच डोक्यावर घेतले. एका मुलाखती मध्ये तिने माझे शिक्षण कमी आहे हे मान्य करत मी पूर्वी बॅकडान्सर म्हणून काम करायचे असे सांगितले .
सध्या ती अश्लील डान्स मुळे खूपच वादाच्या भोर्यात अडकली असून त्यामुळे लोकवर्गातून टीका टिप्पणी ला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी एकदा तिने असे अश्लील डान्स करणार नाही असे व लावणीचा अपमान होणार नाही याची काळजी घेईन असे बोलले असल्याचे देखील वृत्त आहे.
काही युवक वर्ग तिच्या या डान्स मुळे वाहवत जात आहे पुढील काळात तिचा वापर राजकिय फायद्यासाठी होऊ शकतो अशी भीती न राहवून वाटतेच.
पण अश्या कलाकारांना योग्य व्यासपीठ उपलब्ध का होत नाही ? यासाठी आपण कुठे कमी पडतो का? असा प्रश्न ही नक्कीच पडतो.
आम्ही गौतमी च्या कलागुणांचे कौतुक करत असलो तरी तिच्या अश्लील नृत्यावर आमचा कडवट विरोध राहणारच यात शंकाच नाही.
मुख्यसंपादक
[…] कोण आहे डान्स क्वीन गौतमी पाटील ? अमित गुरव […]
[…] कोण आहे डान्स क्वीन गौतमी पाटील ? विजय वैशाली दत्ताराम पराडकर […]