Homeघडामोडीकोल्हापूर जिल्ह्यातुन ६० गुन्हेगार होणार तडीपार कारण...

कोल्हापूर जिल्ह्यातुन ६० गुन्हेगार होणार तडीपार कारण…

कोल्हापूर : ( अमित गुरव ) – कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीचे वारे घुमू लागले आहे.  त्यामुळे निवडणूक काळात सराईत गुन्हेगारांकडून कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याच्या घटना होऊ शकतात. यासाठी सराईत गुन्हेगारांचे पोलीस रेकॉर्ड तयार केले आहे. गंभीर व अतिगंभीर गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसेच ६० गुन्हेगारांना तडीपार केले जाणार,  अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांना दिली. 

  बलकवडे म्हणाले, निवडणूक अगदी चुरशीची होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन होऊन निवडणूका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलीस दलाने जानेवारीपासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्हयातील सराईत गुन्हेगार , निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या अगोदर दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी यांची यादी तयार केली आहे. 

        ज्यांच्यापासून समाजाला धोका उत्पन्न होऊ शकतो अशा गंभीर व अतिगंभीर ६० गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केले जाणार आहे. तडीपार केलेले गुन्हेगार जिल्ह्यात येणार नाहीत याची दक्षता शहर पोलीस उपअधीक्षक व करवीर उपअधीक्षक यांनी घ्यावी अशा सुचनाही बैठकीत केल्या . साते ते आठ टोळ्यांना मोक्का लागणार असून त्यांची यादी तयार केली आहे. मोक्का कारवाईचे प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवण्यात आले आहेत. इतर गंभीर गुन्ह्यातील ४८ गुन्हेगारांनाही जिल्ह्यातून बाहेर हद्दपार केले जाणार आहे. 

     निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत. त्यामुळे तीन -चार महिने अगोदरपासूनच तयारी सुरू केली असल्याचे बलकवडे यांनी सांगितले. 

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular