Homeमाझा अधिकारग्रामसेवकांची कामे व त्यासंदर्भातील माहिती | Gramsevak Information

ग्रामसेवकांची कामे व त्यासंदर्भातील माहिती | Gramsevak Information

ग्रामसेवकांची कामे व त्यासंदर्भातील माहिती

ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी वा चिटणीस या नावाने ओळखतात. ग्रामसेवकाची निवड जिल्हा परिषदेकडून होते, व त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्याचे वेतन जिल्हा निधीतून होते.त्याच्यावर गटविकास अधिकारी यांचे नजीकचे नियंत्रण असते.

ग्रामसेवकांची कामे :

▪️ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे.
▪️ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
▪️गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे.
▪️लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे.
▪️करवसुल करणे.
▪️जनतेला विविध प्रकारचे दाखले देणे.
▪️जन्म-मृत्यू,उपजतमृत्यू नोंदणी निबंधक अधिकारी म्हनून काम पाहणे.
▪️बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कामकाज करणे.
▪️मजूर नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज करणे.
▪️बांधकाम कामगार यांची नोंदणी करणे.
▪️जनमाहिती अधिकारी कामकाज करणे.
▪️जैव विविधता समिती सचिव म्हणून काम करणे.
▪️विवाह नोंदणी निबंधक कामकाज करणे.
▪️आपत्कालीन समिती सचिव म्हणून काकाज करणे.
▪️झाडे लावणे, शौचालय बांधून ते वापरायला शिकविणे.
▪️ग्रामसभेचा सचिव म्हणून कामकाज करणे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular