Homeसंपादकीयचौथा स्तंभ

चौथा स्तंभ

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना राजकारण आपल्यापर्यंत आणून पोहचविण्यासाठी वर्तमानपत्र. आकाशवाणी. दूरचित्रवाणी. पत्रकार. वार्ताहर यांचाही मोठा वाटा आहे. या साधनाप्रमाणे एकाच वेळी खूप मोठ्या संख्येने लोकाशी संपर्क साधला जातो. म्हणूनच त्यांना सामूहिक संपर्क माध्यमे असं म्हणलं जातं
आपणं जर रोज वर्तमानपत्र उघडून पाहिले की त्यात देशातील राजकीय. सामाजिक. आर्थिक. धार्मिक. जातीय. घडामोडींची माहिती मिळते. एकाच घटनेबद्दल वेगवेगळ्या नेत्या पुढारी. यांची वेगवेगळी मतें. कशी वेगळी आहेत हे आपणांस समजावून सांगण्यासाठी संपर्क माध्यमांचा वापर केला जातो. शिवाय ह्या अशा विविध बातम्या प्रकाशित करणार्या वर्तमानपत्राला स्वताच्या एक दृष्टिकोन असतो. त्याचा प्रभाव वर्तमानपत्राला बातम्यांवर अप्रत्यक्षपणे पडतोच. कोणत्या व घटनेची किती माहिती द्यायची तिला किती महत्व द्यायचे. हे त्या त्या वर्तमानपत्राचया धोरणाप्रमाणे ठरते त्यामुळे आपण जे वृत्तपत्र वाचतो त्याचा धोरणांचा आपल्यावरही थोडाफार परिणाम होतोच वेगवेगळ्या विश्लेषण. करणारे लेख त्या घडामोडींवर भाष्य करणारे लेख. अग्रलेख. हे वर्तमानपत्रे आणखी एक वैशिष्ट्य या लेखांमधून अधिक तपशीलवार माहिती आपल्याला मिळते. लेख आणि अग्रलेख यामधून अधिक स्पष्टपणे विशिष्ट मतांचा आणि दृष्टीकोणाचा पुरस्कार केला जातो. त्यामुळे लोकांना एखाद्या विशिष्ट विचारांकडे आकर्षित करण्यात किंवा राजकीय कृतीला उधुकत करण्यात काही वेळेला वर्तमानपत्राचा मोठा वाटा असतो. वर्तमानपत्रातील काही बातम्या वाचून आपण अस्वस्थ होतो. किंवा आपल्याला राग येतो वेगवेगळे पक्ष यांच्या बद्दल आपल्या मनात ठराविक प्रतिभा तयार होतात कित्येक वेळा आपल्या मनातील काही मतांना वर्तमानपत्रामुळे पुष्टि मिळून आपले मत विचार पक्के होण्यास मदत होते. वर्तमानपत्राप्रमाणे मत प्रसाराचे कार्य छोट्या पुस्तिका. पत्रके यांच्याद्वारे केलं जातं. एखाद्या विशिष्ट विषयांची थोडक्यात आणि सोप्या भाषेत ओळख करून देण्यासाठी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते अशा पुस्तिका पत्रके. तयार करतात. एखाद्या कार्यक्रम किंवा आंदोलन यांचीही माहिती करून देण्यासाठी पत्रकाचा वापर केला जातो
अर्थात वरिल सर्व माध्यमांचा उपयोग फक्त वाचण्यासाठी होतो. त्यामानाने आकाशवाणी दूरदर्शन ही माध्यमे जास्त लोकांपर्यंत पोहचू शकतात. दूरचित्रवाणी याचा फारसा प्रसार झाला नव्हता त्या काळी आकाशवाणी हेच मोठं आणि प्रभावशाली माध्यम होतें. बातम्या आणि इतर कार्यक्रम या प्रसार माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचविले जात. दूरदर्शनच्या प्रसारामुळे आता माहिती ऐकत असतानाच संबंधित तपशील आपण पाहूसुधदा शकतो. त्यामुळेच दूरदर्शन हे संपर्काचे सर्वाधिक प्रभावी माध्यम मानलें जाते दूरदर्शन आणि आकाशवाणी या माध्यमाचा नुसत्या बातम्या देण्यासाठीच उपयोग होतो असे नाही. इतर रंजक कार्यक्रमा. मार्फत विचार माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा. माहिती पट. किंवा लघुपट अशा मार्गांनी प्रतयक्ष दृश्याचा मदतीने आपण अनेक घडामोडी समजून घेऊ शकतो. तंत्रज्ञान जसजशी प्रगती होते. स्वातंत्र्य पूर्व काळात लोकसंपर्क पद्धत बदलत जाते. स्वातंत्र्य पूर्व ध्वनी क्षेपनासारखया सोयी जिथे नसतील तिथे वक्त्याला मोठ्याने ओरडून बोलणयाऐवजी. गत्यंतर नसते. त्याउलट आत्ता आधुनिक तंत्रज्ञान मुळे मोठ्या नेत्यांचे भाषण ध्वनिफिती रिक्षातून वाजवून सुध्दा प्रचार केला जातो. अलिकडच्या काळात याबाबतीत झालेला आणखी एक बदल म्हणजे चित्रफितीचा/ व्हिडिओ कॅसेट्स/ प्रचारासाठी उपयोग या नव्या साधनांमुळे मोठे नेते ज्या गावांना भेटी देऊ शकत नाहीत तेथें त्यांच्या भाषणाच्या चित्रफिती परिणामकारक उपयोग केला जातो आणि जास्तीत जास्त जनसमुदायाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जातो
सामाजिक किंवा राजकीय समस्यांची. चर्चा करणारी नाटके तसेच चित्रपट हे सुद्धा आपल्या राजकीय सामाजिकरणाला चालना देत असतात. रंजक पध्दतीने मांडणी केल्यामुळे आपण अशा माध्यमाकडे ओढले जातो आणि अधिक तन्मयतेने त्यातील आशय समजवून घेण्याचा प्रयत्न करतो. अलिकडच्या काळात मुद्दाम राजकीय सामाजिक जागृती करण्याच्या हेतूने देशाच्या विविध भागात पथनाटयाची चळवळ उभी राहत आहे. एखाद्या विषयांबाबत सरकारवर दडपण आणण्यापेक्षा लोकांना जागे करणे ज्यांना अधिक महत्वाचे वाटते. असे आंदोलक पथनाटयाचया मार्गाचा वापर लोकांच्या भाषेत सुटसुटीत स्वरूपात. चौका चौकात नाट्य विषकार सादर करून पथनाट्य द्वारे लोकांना समस्यांची जाणीव करून दिली जाते तसेच राजकीय कृतीला उधुकतही केले जाते
आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये चालणारे चांगलें वाईट बातम्या काम सर्वसामान्य माणसाला कानाकोपऱ्यात संपर्क माध्यमांच्या माध्यमातून कळावया यासाठी संपर्क माध्यमांचा उगम झाला पण आज समाजातील सर्वच प्रसार माध्यमे. बोगस आहेत असे नाही. यातील काही माध्यमाच्या संपर्क माध्यमांचे काम. अजून सुद्धा गर्व निर्माण करणारे आहे. पण काही संपर्क माध्यमांच्या नावाखाली फक्त पैसा मिळविण्याचे साधनं मानलं जातं आहे हे वाईट आहे.

– अहमद नबीलाल मुंडे ( सांगली )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular