Homeवैशिष्ट्येजयंती विशेष-: पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले.

जयंती विशेष-: पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले.

सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका नाहीत तर त्या उत्तम कवियत्री , समाजसेविका , आणि पहिली विद्याग्रहन करणारी महिला आहेत. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महिलांसाठी खर्च केले आहे.
महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना अतोनात संघर्ष करावा लागला तरी न डगमगता त्यांनी आपले व्रत यशस्वी केले.

            मुलींची पहिली शाळा कोणाचीही आर्थिक मदत न घेता सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ साली पुणे येथे सुरू केली. १५ मार्च १८५२ पर्यंत महिलांसाठी १८ शाळा सुरू केल्या. १८४९ साली उस्मान शेख यांच्या घरी मुस्लिम समाजातील महिलांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने शाळा सुरू केली. पती महात्मा फुले हे त्यांचे प्रेरणाच नाही तर चांगले गुरू ही व संरक्षक देखील होते. 
           त्या म्हणत की वेळ विनाकारण व्यर्थ घालवू नका जा आणि शिक्षण घ्या . मागासलेल्या विचार सरणीमुळे स्त्री शिक्षणासाठी समाजाने विरोध केला पण पुठे पुठे मुलींची संख्या वाढली. महिलांच्या शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन सावित्रीबाई फुले यांनी अविरत काम चालू ठेवले त्यांचे हे महिलांसाठी योगदान पाहून १६ नोव्हेंबर १८५२ साली ब्रिटिश शासनाकडून त्यांचा गौरव करण्यात आला. 
           केवळ शिक्षण श्रेत्रातच नाही तर विधवांची परिस्थिती सुधारावी , बालहत्या थांबवाव्यात ( स्त्री भ्रुण हत्या ) म्हणून आश्रमाची उभारणी केली. 
           त्यांची काव्यफुलें आणि बावनकशी सुबोधरत्नाकर या काव्यरचना आजही आपल्या पाहण्यात येतात.
                म.जोतिबा फुले यांच्या निधनानंतर सुद्धा सतत कार्यमग्न राहून समाजाचे ऋण फेडत राहिल्या. १८९७ पुण्यात आलेल्या प्लेग साठीमध्ये स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता रुग्णाची सेवा केली. पण दुर्दैवाने या रोगाने त्यांना देखील ग्रासले आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 

थोडक्यात-:

पूर्ण नाव – सावित्रीबाई जोतिबा फुले
जन्म- ३ जानेवारी १८३१
जन्मस्थान- नायगाव जि. सातारा
विवाह- म. जोतिबा फुले ( बालविवाह परंपरेनुसार अवघ्या ९ व्या वर्षात झाला )
कार्य- भारतातील पहिली महिला शिक्षिका , समाजसेविका
मृत्यू – १० मार्च १८९७

लक्ष द्या -: तुमच्या जवळ सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल अजून काही माहिती असेल किंवा लेखात काही चूक झाली असेल तर कॉमेंट करा. आम्ही ती चाचपणी करून update करू.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular