झाडमाया … झाडमाया …
फळे खाया , फुले ल्याया
देते , झाडमाया .. झाडमाया …
शुद्ध हवा ही सर्वांसाठी ,
गार सावली देते माउली.
पाऊसधारा सुगंध वारा ,
गुराढोराना देते चारा .
झाडमाया.. झाडमाया..
मातीमधुनी अंकुरते ही ,
गगनी उंच झेपावते ही
फुलाफळ्यांच्या फुलोऱ्यातूनी
पशुपक्षांना खुणावते ही ,
झाडमाया … झाडमाया …
दे दान तू मला असे गे ,
माती , पाणी , बियांचे हे .
घे करवुनी माझ्या हाती ,
कार्य रोपांच्या निर्मितीचे हे.
झाडमाया .. झाडमाया…
- प्रविण सूर्यवंशी सर ( मुरगुड , कोल्हापूर )
- कवी पत्रकार तसेच समाजसेवक आहेत

मुख्यसंपादक