Homeघडामोडीडॉ. विजयाराणी पाटील लिखित "महाराणी जिजाबाई कोल्हापूर राज्याच्या रक्षणकर्त्या" पुस्तक प्रकाशन समारंभ...

डॉ. विजयाराणी पाटील लिखित “महाराणी जिजाबाई कोल्हापूर राज्याच्या रक्षणकर्त्या” पुस्तक प्रकाशन समारंभ सोहळा संपन्न

( डॉ. विजयाराणी पाटील लिखित “महाराणी जिजाबाई कोल्हापूर राज्याच्या रक्षणकर्त्या” पुस्तक प्रकाशन समारंभ सोहळा. संपन्न. )

कोल्हापूर – प्रतिनिधी.

कलियुगात आजची तरुणाईने सोशल मिडियावरील व्हाट्सअप, फेसबुक, युट्युब, ट्विटर, इंस्टाग्राम अशा विविध साधनाचा वापर करत वेळ वाया घालवत आहेत. यासाठी रिकामी वेळेत वाचन करावे असे मत डाॅ.पी. एस. पाटील ( प्र.कुलगुरू,शिवाजी विद्यापीठ.कोल्हापूर ) यांनी व्यक्त केले ते शिवाजी विद्यापीठ वस्तूसंग्रहालय येथे दि २१ रोजीच्या
डॉ. विजयाराणी पाटील लिखित “महाराणी जिजाबाई कोल्हापूर राज्याच्या रक्षणकर्त्या” या पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. प्रास्ताविक
प्रा. डॉ. भारती पाटील. कै. श्रीमती शारदादेवी गोविंदराव पवार अध्यासन कोल्हापूर यांनी केले पुढे कुलगुरू प्र. कुलगुरू पाटील म्हणाले कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाची स्थापना करण्याचा इतिहास घडलेल्या कर्तृत्वान स्त्रियांचे कार्य उजेडात आणणे हा महत्त्वाचा उद्देश होता. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अध्यासनाकडून एक संशोधन प्रकल्प राबवला जात आहे कोल्हापूर, सातारा, सांगली या शिवाजी विद्यापीठाच्या कर्तुत्ववान स्त्रियांचा आतापर्यंत उजेडात न आलेला इतिहास या प्रकल्प द्वारे उघडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महाराणी जिजाबाईंनी दाखवलेले अलौकिक शौर्य त्यांची मुसेद्यगिरी त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि त्यांनी समाज सुधारण्यासाठी उचललेली पुरोगामी पावणे या सर्वांचा आढावा लेखिकेने सदर पुस्तकांमध्ये घेतला आहे. या पुस्तकाचे रूपांतर पुन्हा हिंदी व इंग्रजी भाषेत करावे. शिवरायांचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा जगभरात उत्सुकता आहे परंतु मराठी वाचता येत नसल्याने व दडलेला इतिहास जाणून घेण्याची अनेकांची इच्छा व्यक्त होत आहे. सदर पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाच्या कै.श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने केली जाते याचा अभिमान वाटतो आपण हे सर्वांनी पुस्तक घेऊन वाचन करावे व जिजाऊंचा दडलेला इतिहास वाचावा असे कुलगुरू प्रा. शिर्के बोलताना म्हणाले. या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्या संयोगिताराजे छत्रपती लेखिकेला शुभेच्छा देताना म्हणाल्या लेखिका डॉ. विजयाराणी पाटील यांचा अभिमान वाटतो. महाराणी जिजाबाई यांचा इतिहास वाचण्याची संधी मिळत आहे. प्रतिकुल परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात येते न डगमगता लढावे, पुढे जावे यश नक्की मिळते. तर इतिहास सर्वानी वाचन करावा. असे सौ. छत्रपती म्हणाल्या. प्रकाशन सोहळ्याचे पुस्तक विवेचक डॉ. रमेश जाधव. म्हणाले डॉ. लेखिका सौ पाटील यांनी ग्रंथासाठी अनेक मराठी आणि इंग्रजी ग्रंथांचा संदर्भ म्हणून वापर केला आहे त्याचप्रमाणे त्यांनी अनेक दुर्मिळ कागदपत्रांची व विषयासंदर्भात काळजीपूर्वक अवलोकन केले आहे यांचा हा प्रामाणिक प्रयत्न इतिहासाचा एक अभ्यासक म्हणून खूप आवडला काही वेळा प्रामाणिक प्रयत्न हेच भरघोस असे पहिले यश असते म्हणूनच प्राचार्य डॉ. एस. डी. पवार यांच्या व्यासंगी मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या सापेक्षी आणि संदर्भ मूल्य असणाऱ्या ग्रंथाला दात द्यावी प्रोत्साहन द्यावी आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करावे यासाठी हा शब्द प्रपंच करीत आहे. असे म्हणाले व “महाराणी जिजाबाई कोल्हापूर जिल्ह्याच्या रक्षणकर्त्या” यांचा दडलेला इतिहास उजेडात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. लेखिका डॉ. विजयाराणी पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या . कोल्हापूर राज्याच्या महाराणी जिजाबाई राज्यकारभारावर पीएचडी संशोधन पूर्ण झाले व डॉक्टर पदवी मिळाली राज्याच्या राणी सरकार यांचा विषय मला पी.एच.डी साठी मिळाला यासारखे दुसरी समाधान नव्हते याचे श्रेय जाते शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भारती पाटील यांना शिवाजी विद्यापीठ पीएचडी पात्रता परीक्षेतून माझी पीएचपी साठी निवड झाल्यानंतर राज्यशास्त्र विषयात कोणत्या प्रकारचे संशोधन करावे यासंबंधी माझे मनामध्ये चल विचरता होती परंतु संशोधनाचा विषय निश्चित करण्यासाठी डॉ. सौ पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन घेतले मला तीन चार विषय सुचवले आणि त्यातील कोल्हापूर राज्याच्या महाराणी जिजाबाई म्हणावे इतके संशोधन झाले नाही. या विषयावर लेखन करण्याचा मला सल्ला दिला. मला प्रेरणा डॉ.एस. डी. पवार यांच्या कडून मिळाली माझ्या या कार्यात ज्यानी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वाची मी आभारी असलेल्याचे लेखिका डॉ.सौ. पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
यावेळी पोरगल संस्थानाचे ११ वे वंशज दिपालीताई शिंदे, इतिहास संशोधक जयसिंगराव पोवार, जेष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे तसेच कोल्हापूर येथील कवी, लेखक सह कै. श्रीमती शारदादेवी गोविंदराव पवार अध्यासन कोल्हापूर, सर्व स्टाप
श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर, महाराष्ट्र हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य, सर्व स्टाप, हायस्कूलचे मुख्याध्यापक, सर्व स्टाप, कोल्हापूर सह वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन सुश्मिता खुटाळे यांनी केले. आभार प्रा. नेहा वाडेकर यांनी मानले.

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी / लिंक मराठी हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी .
तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular