Homeघडामोडीतुम्ही असाल दादा , पण आम्हाला तुमचे नेतृत्व अमान्य

तुम्ही असाल दादा , पण आम्हाला तुमचे नेतृत्व अमान्य

कोल्हापूर ( अमित गुरव )-: भाजप चे महाराष्ट्र प्रदेशादक्ष चंद्रकांत पाटील व कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंघ घाटगे यांनी आपापले राजीनामे देऊन घरी जावे अशी मागणी खुद्द भाजपच्याच काही नेत्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या शिक्षक मतदारसंघ निवडणूकित झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असे पक्षाचे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा , हातकँगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी.डी. पाटील यांची मागणी आहे.
आ. पाटील हे तर सत्ताधारी नेत्यांना नेहमीच आव्हान देत काही कालावधी साठी चर्चेचा विषय ठरतात . दुसऱ्या पक्षातील नेते फोडून त्यांना पदे वाटणे भाजप ला घातक ठरू लागले हे जानवल्याने तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यांच्या नेतृत्वाच्या आव्हानाला ते कसे लगाम लावतात याचा घोर त्यांच्या हितचिंतकाना ; तर विरोधकांच्या उपहासात्मक चर्चेला उधाण आले आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular