Homeआरोग्यतुळशी चे फायदे

तुळशी चे फायदे

  • तणाव कमी करते
    तुळस दिवसभराचा थकवा दूर करते. अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून, उकळून ते दूध पिण्याने फायदा होतो. याने मज्जासंस्थेला आराम मिळून तणाव कमी होण्याची शक्यता असते.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवते
    तुळशीत मोठ्या प्रमाणात अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-इंफ्लिमेंट्री गुण असतात. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. दररोज तुळशीची पानं खाल्ल्याने फ्लूचा धोकाही दूर होण्यास मदत होते.

उचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यामध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळशी उपयुक्त असते. कफ तसेच वातदोषाचे शमन करणारी, पित्त वाढवणारी तुळशी दुर्गंधाची नाश करण्यास सक्षम असते.

जिभेवर पांढरा थर जमला असता, तोंडाची चव गेली असता तुळशीच्या रसाचे गूळ किंवा साखरेबरोबर बनविलेले चाटण घेण्याचा उपयोग होतो.

पोटात गॅस झाल्यामुळे दुखत असल्यास, पोट जड झाले असल्यास तुळशीची 10-12 पाने कपभर पाण्यात मंद आचेवर उकळावीत. एक कप पाणी उरले की त्यात चवीपुरते काळे मीठ व अर्धा चमचा साजूक तूप टाकून घोट घोट घ्यावे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular