Homeमुक्त- व्यासपीठतू वळून बघावं वाटतं!!

तू वळून बघावं वाटतं!!

रुप गुणांनी वरचढ प्रिये मला सौंदर्याची खाणं दिसतेस तू
हृदयचं देऊन टाकलंय तुला मला लय आवडतेस तू
मी नाही ग तुझ्यासारखा पण मन मागोमाग तुला गाठतं
जास्त काही नाही ग मागत पण तू वळून बघावं वाटतं…………………….।१।


पण तुझा तो वाऱ्यासारखा भिरभिर नखरा
माग तुझा काढताना मारतो चकरावर चकरा
कधी तरी तू फिरवावी नजर असं मनाला वाटतं
जास्त काही नाही ग पण तू वळून बघावं वाटतं……..।२।


स्वतःची छबी सोडून जरा मान वर करून तर बघ
न्याहाळणारे कोण तरी तुला झुरणारं दिसते का बघ
स्वविश्वात गुंतलेली तू मला माझ्याशी बोलावसं वाटतं
जास्त काही नाही ग पण तू वळून बघावं वाटतं……।३।


तुझ्यासाठी जीव ओतणारा दिसत नाही का ग तुला मी
सौंदर्याच्या वजनाने वरखाली जोकत राहतेस मला तू
जाड भिंगाचा तो टाकाऊ चष्मा तू काढून बघावं वाटतं
जास्त काही नाही ग पण तू वळून बघावं वाटतं…….।४।


सावली ही तुझी दुखेल म्हणून नाजूक फुंकर मी घालतो विचारात तुझ्या राणी मी अन्न पाणी ही बाजूला सारतो
रुप,पैशांची भले वानवा जरी मनानं मोठा असल्याचं तू मला मान्य करावं वाटतं
जास्त काही नाही ग पण तू वळून बघावं वाटतं……..।५।


जीवन म्हणजे क्षणाचा खेळ बसेल का सांग ना माझ्या प्रेमाचा तुझ्याशी मेळ
खेळू दे नियती खेळ कसा ही सारं सोडून गंगेला वेडे तू प्रेमाला माझ्या धरावं वाटतं
जास्त काही नाही ग पण तू वळून बघावं वाटतं…….।६।

 *✍कृष्णा शिलवंत* 
      
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular