Homeआरोग्यपंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनी स्वत: लस का टोचून घेतली नाही ? - आंबेडकर

पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनी स्वत: लस का टोचून घेतली नाही ? – आंबेडकर

अकोला : (प्रतिनिधी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केल्याचा करीत आहेत. जुन्या काळात शिकारी लोक शिकारीनंतर असे ढोल बडवीत सर्व जंगलभर फिरत होते, तसाच हा प्रकार सुरु असल्याचा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ते अकोला येथे आपल्या निवासस्थानी ‘यशवंत भवन’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मोदी आणि ठाकरेंनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेतली नाही?, असा सवालही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
पंतप्रधानांनी लसीकरणाचे ढोल बडवत बसण्यापेक्षा कोविड लस स्वतः सिरींज भरून जनतेसमोर त्यामधील औषध टोचून घ्यावे. पंतप्रधानांनी असं केलं तरचं सामान्य जनतेला कोविड लसीबद्दल विश्वास निर्माण होईल. अन्यथा त्या बाटलीमध्ये लस किंवा नुसते पाणीच आहे, याबाबतचा संभ्रम दूर होईल, असं प्रकाश आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘जागतिक आरोग्य संघटने (डब्लूएचओ)च्या प्रमुखांनी जाहीर केल्याप्रमाणे आपल्या पंतप्रधानांनी इतर देशाच्या पंतप्रधानांसारखं नियोजन करणं गरजेचं होतं. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसं न करता मध्यमांसमोर मोठेपणाचं प्रदर्शन मांडल्याची टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular