Homeवैशिष्ट्येपर्यावरण दिन स्पेशल : पर्यावरण रक्षण काळाची गरज 

पर्यावरण दिन स्पेशल : पर्यावरण रक्षण काळाची गरज 

 जगातील जवळपास 100 पेक्षा जास्त देशांमध्ये 5 जून पर्यावरण दिन साजरा केला जातो.  यामागील मुख्य उद्देश म्हणजे,जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे. संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. हा नैसर्गिक परिसर म्हणजे जमीन, हवा, पाणी, झाडे ,नदी, डोंगर जीवसृष्टी हे सर्व. पण हे आज कोठे सुरक्षित आहे ? ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जलप्रदूषण, जमिनीचे प्रदूषण यामुळे जीवसृष्टी धोक्यात आहे.
वाढते उद्योगधंदे, कारखानदारी, दळणवळण , वाढती लोकसंख्या या सर्वांचा परिणाम पर्यावरणावर झाला. यामुळे कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण वाढले आहे. हवामानात होणारा सतत बदल. ग्लोबल वॉर्मिंगचे संकट जगभर घोंगावत आहे. हे जर असेच चालू राहिले तर विनाश अटळ आहे.
मानवाने आपले जीवनमान उंचावण्यासाठी नैसर्गिक साधनांचा वापर केला. नैसर्गिक पर्यावरणात अनेक बदल केले. रस्ते, घरे ,शेती, धरणे ,उद्योगधंदे इ. घटकांची निर्मिती केली. अजूनही मोठ्या प्रमाणावर चालूच आहे. या सर्व घटकांचा परिणाम पर्यावरणावर झाला. प्रचंड वृक्षतोड, सांडपाणी यामुळे प्रदूषण वाढले आहे.
नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खर्‍या अर्थाने पर्यावरण समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु, यात शंका नाही.

पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करुया. पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्‍या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरऑईल अशांची पनुर्निर्मिती करुया. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करुया. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करुया . प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्‍या कागदी पिशव्या वापरुया. अन्न आणि भाजीपाला प्लॅ‍स्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम पापुद्र्यात ठेवूया. पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया. घरातील रुम हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळूया. गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया. घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करुया. याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्‍या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करुया.आपण छोट्या छोट्या गोष्टीतून पर्यावरण संवर्धन करू शकतो. गरज आहे ती जनजागृतीची. आपण स्वतः पर्यावरण प्रेमी होऊन इतरांनाही पर्यावरण वाचवा संदेश द्या.
आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ, रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्‍या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु.
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शक्य तेवढे जास्त झाडे लावावी त्याचे संवर्धन करावे. झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा. पर्यावरण वाचवा ,जीवन वाचवा. पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे. समस्या व संवर्धनाची जागृकता निर्माण करणे. पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे. हा पर्यावरण दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू आहे.
माणूस हा निसर्गाचा भाग आहे. निसर्गाला जखमी करून मानवाला जगता येणार नाही.
आज कोरोना महामारीच्या काळात पर्यावरणाचे महत्त्व अधिक समजले आहे. पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कित्येकांना प्राण गमवावे लागले. याकडे आपण डोळेझाक केली तर भविष्यात याचे दुष्परिणाम तीव्र जाणवतील. एक झाड पन्नास वर्षे जगते. लाखो रुपयांचा ऑक्सिजन देते. मातीची सुपीकता वाढविते. प्रदूषण रोखण्यास मदत करते. पाणी पातळी वाढवते. हवामान संतुलित ठेवते.
सांसे हो रही है कम
आवो पेड लगाये हम/
5 जून पर्यावरण दिनी शपथ घ्या. नवा संकल्प करा. आपल्या परिसरात घाण होणार नाही याची काळजी घ्या. प्लास्टिकचा वापर टाळा. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करा. नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जपून करा. प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावा. पाणी आडवा पाणी जिरवा. पाणी वाया जाऊ देऊ नका. झाडे लावा आणि ती जगवाच. तरच पर्यावरण वाचू शकते.

पर्यावरण संवर्धन गरज काळाची
तरच शाश्वती माणसाच्या जीवाची

जागा हो निद्रिस्त माणसा
पर्यावरण संवर्धनाचा घे वसा.

लेखक – श्री.किसन आटोळे सर
वाहिरा ता.आष्टी जि.बीड
प्रा.शिक्षक

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular