Homeमुक्त- व्यासपीठपवित्र इथली माती

पवित्र इथली माती

पवित्र इथली माती
शूरवीरांच्या रक्ताने न्हालेली
पवित्र इथली माती
भाळी लावूनी तिजला
जपू देशभक्तीची नाती …

मातीने दिले शूरवीर
येता संकटे भूमीवर
वाचा पराक्रमाची गाथा
इतिहासाच्या पानावर ..

कणकण बोले मातीचा
भारत माता की जय
गनिम चारीमुंड्या चीत
दसदिशेला विजय …

इमान राखून मातीशी
घेतो मी आज आण
अर्पू तन-मन-धन
वाढवू तिरंग्याची शान …

कवी – किसन आटोळे सर
वाहिरा ता.आष्टी जि.बीड

http://linkmarathi.com/भावपूर्ण-श्रद्धांजली-बिप/
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular