Homeघडामोडीपुन्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार

पुन्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार

पुणे – (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी अचानक पणे शपथविधी पहाटेच उरकली . आणि महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली होती. पण त्यांचे तत्कालीन सरकार हे अवघे ८० तासाचेच अस्तित्व टिकवू शकले.
पण पवार आणि फडणवीस हे पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशीच एकत्र येणार अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे दोन दिगग्ज नेते पुण्यातील एका मंचावर एकत्र उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यावेळी त्या दोघांच्यामध्ये राजकीय फटकेबाजी काय होणार हे पाहण्याची सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
त्यांचे सरकार पडल्यानंतर माठा येथील एका लग्नसमारंभात ते हास्यविनोद करताना दिसले मात्र दुसऱ्या वेळी बाणेर येथील कोविड सेंटर उदघाटन प्रसंगी त्यांच्यात खूपच जुगलबंदी रंगली होती. आता तिसऱ्या वेळी काय घडणार ते उद्या कळून येईल.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular