Homeसंपादकीयपुन्हा ३ दिवस लॉकडाऊन होणार …?

पुन्हा ३ दिवस लॉकडाऊन होणार …?

सद्या लॉकडाऊन हा शब्द काही नवीन नाही. आबालवृद्ध लोकांना याची चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळेच पुन्हा लॉकडाऊन होणार अश्या आशयाचे काही लोक संदेश फिरवत आहेत . पण आपण त्यामध्ये नीट पाहिले तर त्याची तारीख 29 ते 31 फेब्रुवारी अशी असून तारीख न वाचता काही लोकांनी गैरसमज करून घेऊन एकप्रकारे धास्ती घेतली आहे. आपण अगदी सहज तो संदेश फिरवतो पण त्यामुळे एखाद्याचे फार मोठे नुकसान होऊ शकते याची कदाचित आपपल्या जाणीव सुद्धा नसते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात त्यामुळे 29 ते 31 ही तारीख या महिन्यात येणारच नाही तेव्हा लोकांनी काळजी करू नये. तसेच अशीच क्रिएटिव्हिटी योग्य ठिकाणी वापरून समाजाला व एकूणच देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी मी या व अश्या अनेक उद्योगी माणसांना लिंक मराठी मार्फत आवाहन करतो.
सोशल मीडियावर अफवा पसरवणे, गुन्हाशी संबंधित संदेश किंवा व्हिडीओ करून दहशत माजवणे हा अपराध असून शिक्षेस पात्र आहे. आपल्या आजूबाजूला असे काही प्रकार घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्याची कल्पना द्या . अफवा पसरवू नका आणि त्याला आळा घालण्यासाठी सहकार्य करा.

अमित अशोक गुरव ( आजरा , कोल्हापूर )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular