Homeमुक्त- व्यासपीठपोहता पोहता स्वप्नं वाहून गेली..

पोहता पोहता स्वप्नं वाहून गेली..

काहीच कळलं नसेल काय अर्थ आहे या शीर्षकाचा हो कारण वाचकांनी फक्त शीर्षक पाहून कमेंट देऊ नये आत काय लिहिलं आहे काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे याकडे लक्ष द्यावं इतकाच उद्देश

आपल्या ला विचारल ना कोणीतरी की आपला आवडता ऋतू कोणता जास्त आवडणारा ऋतू म्हणजे “पावसाळा” च असतो,

आभाळातून धर्तीवर कोसळणारे ते अलगद थेंब, या जमिनीवर प्रतेक वस्तूला, आणि जीवाला स्पर्श करतात, पावसाची पहिली सर जमिनीला भेटली की जो सुगंध असतो तो फक्त पावसाळ्यात च अनुभवतात येतो…
निसर्गाच्या दाही दिशांना जणू उत्सव चालू असतो, पाने , फुले, नदीचं झुळ जुळ वाहणार पाणी, मंद गार वारा, यांचं एक प्रितीचे मंजुळ गान चालू अस्त, पावसाच्या थेंबाचा घरावर आदळणारा आवाज, कधी खिडकीतून, कधी दारावर उभ राहून तर कधी गॅलरी तून आपण या ठेंबाना स्पर्श करत असतो…

पर्यटन स्थळ, धबधबे, अगदी जत्रा भरावी तशी गर्दीत न्हाऊन निघालेली असतात..
काहीतरी गोड भावना असते यांना स्पर्श करण्याचा आणि पावसाचा नाचण्याचा आणि भिजण्याचा आनंद अगणीतच आणि अफलातून……

परवाच मी आणि माझे “ते” आणि माझी कन्या काही कामानिमित्त बाहेर गेलो असता परतीच्या वेळी जो असा काही पाऊस आला..
नेहमी लाँग ड्राईव्ह इच्छा खूप असते लोकांना पणं मला अचानक पने ” रेन विथ लाँग ड्राईव्ह ” फील करता आले ……यापेक्षा जास्त आवडल ते माझ्या मुलीने ही ते एन्जॉय केलं… माझा नेहमी एक उद्देश असतो मुलांच्या बाबतीत महागडी खेळणी घेऊन खेळत बसवण्यापेक्षा आयुष्यातला खरा आनंद कश्यात आहे हे जाणवून देणं, पावसात तला आनंद पावसाळ्यातच मिळतो.

या पावसाच्या सरिच खूप वेगळ्या आहेत जीव लावणाऱ्या आणि जिव्हाळा देणाऱ्या

पाऊस असल्याशिवाय शेतकरी काही पिकवू शकत नाही , ना कोणता जीव पाण्याशिवाय राहू शकतो, हा ऋतू आल्यावर मनसोक्त कोसळून गेला की कोणत्याही जीवाला वर्षभरातील पाण्याची कमतरता भासत नाही.प्रतेक धरण, तलाव, नद्या, कृत्रिम रीत्या तयार केलेली तलाव हे स्त्रोत वर्षभर उपयुक्त ठरतात.

पणं….

गेल्या २ वर्षात पावसाचं रूप काहीतरीच बदललं आहे, खवळलेला समुद्र कसा तसा खवळलेला पाऊस असही काहीतरी म्हणू शकतो आपण…
अश्यावेळी ढगफुटी, अतिवृष्टी, मुसळधार पाऊस असे शब्द कानावर पडत असतात.

रौद्र रूप धारण केलं आहे पावसाने या वर्षातही चालूच आहे…त्या मागचे ३ ते ४ वर्ष पाहिली तर पाऊस नव्हता च मुळी….दुष्काळ परिस्तिथी पाहायला मिळत होती .

गेले कित्येक वर्ष मी मुंबईत राहते मुंबई चा दर वर्षीचा पाऊस पाहते मुंबईची तुंबई व्हायला जरा सुद्धा वेळ लागत नाही, सतत पडणाऱ्या मुसळधार सऱ्या अगदी भारतमाता, हिंदमाता, लोअर परेल, सायन, माटुंगा, ठाणे, कुर्ला, ते अख्खी मुंबई “स्विमिंग पुल” होताना दिसते.

यात मग स्टेशन तर पहिलेच भरले जातात रेल्वे रूळ तर शोधून पणं सापडणार नाहीत,
आज कामावर मी पोहचेन की नाही हाच एक विचार मुंबई करांचा असतो पावसाळ्यात ,.की कुठे तरी अडकेन मी प्रवासात हा विचार असतो.
आणि अस होतही जेंव्हा पाऊस वाढतो तेंव्हा लोक अडकली जातात .
कोण ट्रेन मध्ये, कोणी ऑफिस मध्ये, प्लॅटफॉर्म वर, कोणी टॅक्सीमध्येच, बसमध्ये, सांगता येत नाही कुठे कुठे सापडले जातात हे जीव.

२६ जुलै आणि २९ ऑगस्ट्ट सारखे पावसाळे मी ही पाहिलेत इथे ,
पणं यावर्षी तर उच्चांक च गाठला पावसाने…फक्त थैमान.

बी डी डी चाळी असो की बिल्डिंग असो, व्यायामशाळा असो की मैदान इकडे पाणीच पाणी नाले तुडुंब भरलेले, लोकांची घर , झोपड्या, तळमजले पाण्याने पूर्ण भरून जातात अश्यावेळी घरातील सर्व साहित्य पाण्यात अस्त आणि ते ही फक्त पाण्यात नाही गटाराच्या घान पाण्यात, घरची भांडी असो की कपडे की फर्निचर, जीवनावश्यक सर्वच वस्तू आणि जेव्हा ते पाणी ओसरत तेंव्हा त्यातील कोणतीही वस्तू वापरण्या योग्य राहिलेली नसते.

मुंबई त पडत आलेल्या इमारती वेळे पूर्वी खाली होवो ना होवोत पावसाळ्यात नक्की कोसळतात मग काय जीवितहानी ठरलेलीच आहे
तेंव्हा त्यांचे संसार आणि व्यक्ती असेच विनाकारण बळी जातात.
सोसाट्याच्या पावसाने वाऱ्यांने भिंती, छत, झाड कोसळायला चालू होतात.आणि कुणाची डोकी फुटतात तर कुणाच्या ४ चाकी गाड्या.
गेल्या वर्षी एक डॉक्टर वाहून गेले चक्क नाल्यातून, काय बोलावं आणि काय नाही काय यात आपली चुकी नाहीय ?

हे तर दरवर्षी ठरलेले च आहे.

हे का सर्व घडत ? कुणाला कळतय का बोलणार आहे मी पुढे

गेल्या वेळेस कोल्हापूर पुर परिस्थिती पाहायला मिळाली, यावेळी ही कोल्हापूर , चिपळूण ची अवस्था पाहायला मिळाली ,अक्षरशः डोळ्यात पाणी वाहत होत बातम्या पाहून आणि ते पाणी वाहून गेल्यावर ची चित्र पाहून.

अख्ख कोल्हापूर बुडालेले त्या पाण्यात ,
पुरात वाहत होत सर्व सांसारिक वस्तू , व्यक्ती कुठे कुठे होत्या काही थांगपत्ता नव्हता, वाहन वाहून गेली होती, गुरे ढोरे वाहून गेली होती, मूलबाळ कुठे कुठे जाऊन शोधत होते,
ते पाणी ओसरल्यावर मेलेली गुरांचे वेडिओ व्हायरल होताना पाहून डोळ्यांच्या धारा बिना काही सांगता वाहत होत,.
आपत्कालीन व्यवस्थापनेच्या तुकड्या जितक जमेल तितकं लोकांना वाचवत होते.स्वतः जीव कुठे कुठे नेत होते..
आया, बाया ,आज्या ,लहानगी पोर , तरणे एका ठिकाणी आणून सोडत होते..
काय ती भयावह परिस्थिती .
ऐकून ऐकून कानात आवाज घुमत होता, दिसत होती पंचगंगा आणि इतर नद्या.
सोशल मीडिया वर दिसणारी पुराची अवस्था बुडालेली घर, मंदिर, रस्ते, शेती ची नुकसान, पिकांची नुकसान, दिसत होत तर फक्त गढूळ पाणीच पाणी दाही दिशांना.
काय वाटलं असेल असा संसार वाहून जाताना, आयुष्याची जमापुजी पोहत पोहत वाहून जाताना.
आपल्याला 1000 रुपये कधी हरवले तर दिवस भर वाईट वाटून राहत.
यांची तर हजारो स्वप्न वाहून गेली
पुन्हा ती स्वप्न उभारण्यासाठी शुण्या पासून सुरुवात,

राहायला घर नाही , छत उडाली, अन्नधान्य नाही, कपडे नाहीत, गुर गेली, अश्यावेळी हतबल झालेला माणूस करू तरी काय शकतो.
तरीही माणूस कधी हार नाही मानत कोल्हापूर पुन्हा उभ राहील आपल्या स्व बळावर.
चिपळूण ही तसच आहे.

उल्हास नदी भरली आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस तिच्या पाण्याच्या विळख्यात चक्क 17 तास होती, तेंव्हाही आपत्कालीन व्यवस्थापनेच्या तुकड्या नी प्रवाशांना बाहेर काढून जीवित हानी टाळली होती.

महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक थैमान होत फक्त पावसाचं भारतातली अजूनही राज्य आहेत च यात तीही काही मागे नाहीत.

रायगड मध्ये, गेल्यावेळी आलेलं वादळ श्रीवर्धन मध्ये झालेली हानी , केरळ मधील वादळ यावेळी तोउक्ते वादळ (tauktae cyclone), किती थैमान घातलं होत याने, घर, जमिनी, झाडे, कितीतरी अगणित नुकसान..
क्यार, वायू,.फणी, पेताई, गाजा, तितली, ओक्खई, अशी भरपूर प्रमाणात वादळ येऊन गेली आहेत

का होत अस ?

आपल्याला हे सर्व कळत नसावं इतके तरी आपण अडाणी नाही आहोत .
या पार्शवभूमीवर मी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे ते म्हणजे “ग्लोबल वॉर्मिग” काय अस्त हे “जागतिक तापमान वाढ” आणि मानव निर्मित , कृत्रिमरीत्या घडतं असलेल्या घटनांमुळे.
शिकलो आहोत लहानपणापासून निसर्ग कसा जोपासायचा, निसर्गाची काळजी कशी घ्यायची,
मग निसर्ग कोपला की काय होत.

झाड तोडायची माहीत आहे पणं झाड लावा हे घरोघरी जाऊन सांगावं लागत का ?

कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडले जाते,त्यामुळे साथीचे रोग वाढतात.

वाढलेले प्रदूषण : आज प्रत्येकाला वाहन हवय चालायचं कुणाला च नाहीय
आपण घेत असलेली हवा पाहिला आहे का कधी किती दूषित आहे .

शहरात रात्रीच चांदण चुकूनही दिसणार नाही इतकं वायू प्रदूषण हवेत आहे..

यामुळे शरीरात किती हानी होते

आपला परिसर स्वच्छ ठेवा, ठेवतात नाही अस नाही,
पण शेजाऱ्यांच्या दारात किती कचरा असेल काही अंदाज नाही.
नाले, नद्या, समुद्र , रस्ते, आजूबाजूचा परिसर, मैदान, कधी पाहिलंय कचराच कचरां दिसणार…

कचरा पेट्या आहेत ना की नाही आहेत ?
मी मरीन ड्राईव्ह ला जाते कधी कधी समुद्रात काय कचरा आहे त्यात बीएमसी वाले रोज कचरा काढतात आणि पुन्हा आहे तसा..

गेल्या वर्षी च्या पावसाळ्यात मरीन ड्राइव्ह च्या इथे तर चक्क समुद्राने आपल्यातला कचरा लाटांनी बाहेर फेकला होता…
खर वाटत नसेल तर गेल्यावर्षी ची न्यूज किंव्हा यूट्यूब वर पाहू शकता….
इतका प्रचंड प्रमाणात तो कचरा बाहेर टाकला जायचा की बी एम सी च्या गाड्या ५ मिनिटात भरल्या जायच्या आणि ते पाहताना
एकच म्हण मला आठवली
“आपण जस देतो तस आपल्याला पुन्हा मिळत”

समुद्र दूषित झाला की त्यातील मस्त्य व्यवसायावर परिणाम होतो आणि तेच दूषित पाणी सागरी जीव घेतात, आणि तसच ते आपल्या शरीरात प्रवेश करतात.

काहीतरी वाटावं आपला देश, आपल राज्य, आपला परिसर, आपल घर, आपली शाळा,आपल्या नद्या, काहीतरी अस्तित्व आहे त्यांचं
बाहेरगावच्या देशात जाऊन पहा कधीतरी काय स्वच्छता व नीटनेटके पना आहे.
आणि जाता येत नसेल तर गूगल वर पाहू शकता.

मुलांना शौचालय ला झालं की कुठे ही बसवून देतात आपल्या इकडे,..
आपला देश आहे थोडी घाण केली तर काय जातंय ..

आजही मी जेव्हा जेव्हा काही लोकांना रेल्वे पटरित खाऊन झालेल्या पिशव्या, पॅकेट्स, वॉटर बॉटल्स आणि अन्य वस्तू टाकताना पाहते तेंव्हा मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करते की हे चुकीचं आहे…
पण मुळात हे सांगणं गरजेचं आहे का?
अशिक्षित आहोत का आपण ?
की रेल्वे कर्मचाऱ्यांना काही काम नाही म्हणून हे उद्योग सुचतात का?
प्रतेक डब्ब्या जवळ एक कचरापेटी आहे .

शहरात पाहिलं तर कचरा कचरा पेटीत कमी आणि कचरा पेटीच्या बाहेर जास्त पाहायला मिळतो, म्हणजे आपल्याला त्या डब्ब्यात टाकण्या इतपत पणं तसदी घ्यायची नसते.

यावेळी कोरोना आला आणि सोबत लॉकडाऊन घेऊन आला सर्व वाहने बंद , त्याकाळात न्यूज ला एक चांगली बातमी होती..

वाहनाचा वापर कमी झाला त्यामुळे वातावरणात तील वायू प्रदूषण एकदम च घटल गेलं आहे.

कारखान्याचा धूर किती प्रदूषण करतो किती पाणी दूषित करतो,.
किती दुष्परिणाम होणारे वायू हवेत मिसळले जातात याचा काही अंदाज.
यासाठी काहीतरी उपाय आहेत..
आपण निसर्गाला काही देण्याचा प्रयत्न करतो का उलट निसर्ग आपल्याला खूप काही देतो अगणित जे आपण मोजू ही शकत नाही
सिमेंट काँक्रीटच्या असंख्य बिल्डिंग बांधून ठेवल्या आहेत.

कचरा व्यवस्थापन करून आपण कंपोस्ट खत निर्माण करून शकतो त्यामुळे शेतीसाठी फायदा होणार, रासायनिक खतांचा वापर टाळला जाईल,
वाहणाऱ्या कचऱ्यामुळे जल प्रदूषण कमी होईल, आपला परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल, आणि शेतीच्या भेसळयुक्त उत्पादन पासून मानवी शरीर रोग प्रतिकार शक्ती वाढवू शकेल..

आज बेरोजगारी इतकी वाढली आहे की कचरा व्यवस्थापन करून ही खूप चांगला व्यवसाय करू शकतात..

काही बाहेरगावच्या ठिकाणी कचरा घेऊन या आणि जेवण घेऊन जा ही पद्धत राबवली जाते यात किती चांगला उद्देश आहे.
आणि ही पद्धत भारतात ही राबवली जात आहे काही ठिकाणी

कुठे कुठे वृक्ष रोपण चे उपक्रम राबवले जात आहेत

सुखवार्ता ,कुर्ला सोसायटी मुंबई,
अंधेरी विजयनगर सोसायटी, मुंबई
पुन्यात कचऱ्यापासून वीजनिर्मती करणारे २५ प्रकल्प आहेत पण त्यातले सध्या ५ प्रकल्प बंद आहेत..
सातारा शेंद्रे गाव
सातारा बनवडी गाव
सिंधुदुर्ग कचरा निर्मूलन प्रकल्प

हे वरील काही ठिकाणं आहे जिथे कंपोस्ट खत तयार केलं जातं, पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.अजूनही भरपूर अशी ठिकाण आहेत, संस्था आहेत, प्रकल्प राबवले जातात. तुम्हा ला माहिती हवी असेल तर गूगल वर यूट्यूब वर माहिती मिळवू शकता. आणि व्यवसाय करू शकता.

ओझोन च्या थरातले चढ उतार,
वाढते प्रदूषण , प्लास्टिक चा अतिवापर, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदुषण, भू प्रदूषण , वृक्ष तोड हे जे आपण निसर्गाला देतो तेंव्हा निसर्ग ही आपल्याला हे भरभरून देणारच ..

आपली जमीन, आपली माती, आपली झाड, आपली हवा, आपला परिसर, आपल वातावरण, आपल पर्यावरण हे जोपर्यंत नीट नेटकं नाही ठेवत
तोवर आपली सर्वांची ” स्वप्न ” ही अशीच

पोहता पोहता वाहून जाणार आहेत…

तेंव्हा जगायचं असेल आणि आपल्या माणसांना जगवायच असेल तर निसर्गाची काळजी घ्या.
समतोल राखण्यासाठी काय करावं लागेल यासाठी उपाय शोधा..आणि तसे वागा., मनापासून प्रयत्न केले तर नक्की च आपण सर्व या निसर्गाच्या कोपा पासून वाचू शकू.

पाऊस जास्त पडला तरी नुकसान आहे आणि नाही आला तरी आपलच नुकसान आहे त्यामुळे विचार नक्की करा

–+++–
आजही जळगाव जिल्ह्यात किती तरी नद्यांना पूर आला आहे,
हवामान खात्याच्या अंदाजानुसार
आताही बातमी आहे महाराष्ट्रात ढगफुटी या ४८ तासात होणार आहे आणि त्यात ” गुलाब” नावाचं चक्रीवादळ थैमान घालणार आहे ..पूर्ण अलर्ट दिला आहे .
विदर्भ , मध्य महाराष्ट्र, मराठवाडा कोणतही ठिकाण आज अतिवृष्टी पासून वाचलं नाहीय त्यामुळे कृपया आपल्या निसर्गाला आपण सांभाळू निसर्ग आपल्याला नक्कीच सांभाळेल.

धन्यवाद
रुपाली स्वप्नील शिंदे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular