Homeघडामोडीप्रा.रसूल सोलापुरेंच्या ' फाटलेलं आभाळ' कादंबरीस पुरस्कार जाहीर

प्रा.रसूल सोलापुरेंच्या ‘ फाटलेलं आभाळ’ कादंबरीस पुरस्कार जाहीर


महागाव
येथील महात्मा फुले ज्युनि.
कॉलेजचे प्रा. रसुल सोलापुरे यांच्या ‘फाटलेलं आभाळ ‘ या ग्रामीण कादंबरीस झाडी बोली साहित्य मंडळ चंद्रपूर-गडचिरोली यांच्यावतीने राज्यस्तरीय ‘डॉ. घनःश्याम डोंगरे स्मृती कांदबरी पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे.पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी पत्राद्वारे कळविले.पुरस्काराचे वितरण १२ मार्च रोजी होणाऱ्या २९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनात होणार आहे.

प्रा.सोलापुरे यांची आतापर्यंत शर्यत ,पट्ट्यावरची माणसं, भिंगरी, हिरवी माती, सुकलेल्या झाड ,वचपा, फाटलेलं आभाळ तिरावरची पाखरं आधी पुस्तके प्रकाशित झाले आहेत.त्यांच्या अनेक साहित्यकृतीला आत्तापर्यंत २७ पुरस्कार मिळाले आहेत.पुरस्कार मिळाल्याबद्दल समर्थ महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन शंकरराव पाटील,प्राचार्य आय. एस.पाटील,संस्था प्रतिनिधी डी. एस. पाटील, आण्णासाहेब पाटील, ग्रा. प. फिरोज सोलापुरे, यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी लिंक मराठी हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी .
तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular