Homeसंपादकीयबँचलर मुलांची कोरोना नंतरची व्यथा म्हणायची कि लढाई ?

बँचलर मुलांची कोरोना नंतरची व्यथा म्हणायची कि लढाई ?

   कोरोणापूर्वीची परिस्थिती तशी बरीच म्हणायची.कोरोणापूर्वी अवघा १०/१५ हजार पगार व दोन तीन तास ओवरटाईम करून किंवा डबल ड्यूटी करून १५/२० हजार पगार येत होता.त्यात तो गावाला ४-५ हजार पाठवून राहिलेल्या पगारात खानावळ,खोली भाडे,रोजचा चहा नाश्ता,ईस्त्रीचे कपडे,कोलगेट पासून धुवायच्या कपड्यापर्यत व मध्येच कधी आजारपण आलं तर आणि डाँक्टरला व थोडी पुढच्या आयुष्यासाठी करत असलेली बचत.म्हणजेच त्याला तो पगार जेमतेम परवडण्यासारखा होता आणि त्यात तो खूषही होता.
     पण कोरोणा आला आणि या सगळ्यांच्या ताटातला घास कोरोणाने हिरकावून घेतल्यासारखं झालं.कोरोणा आला म्हणून आपला जिव वाचवायला हि मुलं गावाला गेली. कंपनी / ऑफिस बंद झाले. काहि कंपन्यानी आपल्या नोकदाराला पगार चालू ठेवला तर काही कंपनी /ऑफिस वाल्यांनी एक दोन महिने पगार दिला व नंतर बंद केला. कोरोणाचे ते सहा-सात महिने कसतेरी ढकलत काढणारा नोकरदार पुन्हा मुंबई सुरळीत चालू होतेय हे पाहून हळूहळू यायला लागला ते फक्त आपली नोकरी वाचवण्यासाठी.आपल्या जिवापेक्षा नोकरी सांभाळणे खूप गरजेचे होते .कारण काही कंपन्या /आँफिस वाले नोकदारांना तसा मजावच करत होते.आपली कोरोणा काळात नोकरी गेली तर आपले व आपल्या कुँटूबियाचे हाल होतील व दुसरी नोकरी मिळनेही अवघड होईल या भितीने बँचलर मध्ये राहणारी ग्रामस्थ मंडळी हळूहळू मुंबईत येऊ लागली.काही मंडळी तर अजून गावीच आहेत. कारण का ? तर काही आँफिस बंद झाली तर कंपनीना जास्त कामगार परवडत नाही म्हणून काढून टाकले.काही नवीन येणारे तर लांबच राहिले.
    बँचलरमध्ये हि दाटिवाटीने राहणारी ग्रामस्थ मंडळी आली खरी आणि जरी येत असली तरी आल्यावर राहण्यास येत असलेली अडचण,रूम मालकाने वाढवलेले भाड्याचे दर ,खानावळी ने वाढवलेले जेवणाचे दर याला अजूनही तोंड देत आहे.ट्रेन बंद असल्याने या गर्दीच्या बस मध्ये चढत कामावर जावे लागते.काही कंपन्यानी तर पगारच कमी केले तर काही कंपन्या या कोरोणाकाळात दिलेला पगार वजावट करून घेत देत आहेत.ओव्हर टाईम करून जास्त पगार घेणारा नोकरदार ८-९ तासाची ड्यूटी करून घरी येतोय. महिन्याला मिळल तेवढा पगार घेतोय. पगार जास्त येत नसल्याने कंपनीला पगार वाढवण्यायस सांगितले तर आहे त्या पगारातच काम करा नाहीतर सोडून जावा अशे म्हणणाऱ्या या कंपन्या ,नोकरी दुसरी मिळेल न मिळेल ,मिळालीच तर ईथल्या येवढाच पगार मिळेल का हि शंका.लग्नाची न वाजलेली बिगूलहि हिरावला .सरकारी नोकरदारांना भरभक्कम पगार, सवलती व ट्रेनची सुविधा दिली गेली पण सामान्य माणसाला ट्रेनची सुविधा नसल्याने प्रवास खर्चाचा बोजा व शारीरिक त्रास दोन्ही गोष्टी सोसाव्या लागतात परिस्थिती गरीब असल्यामुळे नाईलाज असतो या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो .

लाँकडाऊन व लाँकडाऊन नंतर होणारी फरफड थांबायच नावचं घेत नाही.
कोरोणानंतर अशा अनेक प्रश्नात व संकटात अडकून पडलेला बँचलरमधला हा ग्रामस्थ वर्ग कधी बाहेर पडणार ? कि याना कोण मदत करणार का ? कि हे आसेच राहतील!सरकारने याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे
मनाला खिळवून ठेवणारे असे प्रश्न मुंबई मध्ये राहणाऱ्या बँचलर मधील ग्रामस्थां बरोबरच आपलं कुटूँब घेऊन येणाऱ्या व भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मराठी भाडेकरूनां देखिल पडला आहे.

लेखक- शैलेश बाळासाहेब मगदुम

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular