"स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी पान्हा नयनी पाणी" असं एक गीत आधुनिक काळातही ऐकण्यास मिळते. स्त्री जन्मा तुझी कहाणी, फारसी बदलेली नाही असं मला वाटतं. भारतच एकमेव असा देश असावा जिथं स्त्रीला एकतर मंदिरात बसविले जाते, नाहीतर पायाची वाहन पायीच छान म्हटले जाते.
आपल्याकडे सावित्री, सीता, सत्यवती अशी कितीतरी पतिव्रता स्त्रीची उदाहरणे आपल्या धर्मग्रंथात पहायला मिळतात.
सिता एक प्रतिव्रता नारी असून तिला सुद्धा रावणाच्या घरी राहिल्यावर रामाने सीतेला अग्नीपरिक्षा देण्यासाठी भाग पाडले आणि शेवटी स्वतःला धरणीमध्ये सामावून घेतले, म्हणजे एक प्रकारे स्त्री वरील अन्यायच म्हणावा लागेल. याचाच अर्थ पुरातन काळापासून स्त्रिला देवी किंवा सन्माननीय वागणूक मिळत असली तरी त्यात पुरूष प्रधान संस्कृती जाणवते. आजच्या स्त्रीला देवी म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून वागणूक हवी आहे. आजच्या युगातल्या स्त्रिया बऱ्याच क्षेत्रात आघाडीवर पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात, पण तरीही पेपर वाचायला घेतला की अनेक बातम्या लक्ष वेधून घेतात. भारतरत्न लता मंगेशकर, सुनीता विल्यम्स चे अवकाश यशस्वी पदार्पण, मेरी कॉमला गोल्ड मेडल, सुधा मूर्ती यशस्वी उद्योजिका आणि पान पलटले की बातमी दिसते की, हुंड्यासाठी नव विवाहितेची हत्या /आत्महत्या, कॉलेजच्या युवतीवर एक तर्फी प्रेमातून एसिड हल्ला, सामुहिक बलात्कार, भ्रूणहत्या अश्या बातम्या वाचल्या की आपल्या मनात प्रश्न पडतो आजच्या स्त्रिया कुठच्या ही क्षेत्रात मागे नाही. मग महिलांवरील अत्याचार कमी न होता वाढत का गेले ?
इतिहासामधल्या अनेक कर्तृत्ववान स्त्रियांची जसे, जिजाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अलीकडच्या काळात इंदिरा गांधी यांचे उदाहरण दिली जातात पूर्वीपासूनच स्त्रीने कर्तृत्व गाजवले तरी स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते आज स्त्री कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर असूनही मुलगी म्हणुन जन्माला आली की वाईट वाटते. जन्माला यायच्या आधी पासूनच मुलीचा दुस्वास सुरू होतो. दुसरी मुलगी झाली की, भ्रूणहत्या केली जाते. फक्त मुलासाठी मुलगी झाल्यावर तिच्या संगोपनात सुद्धा फरक जाणवतो. मुलींनी घरात मोठ्याने हसू नये, बोलू नये, मुलींनी व्यवस्थित वागावं, अंगभर कपडे परिधान करावे, घरकामात पारंगत व्हावं अश्या अनेक बाबी तिला शिकवल्या जातात. मुलाच्या जातीने कसेही वागले तरी चालते,पण मुलींनी कसेही वागून चालत नाही. मुलगी म्हणजे काचेचे भांडे. मुलींच्या जातीने सांभाळूनच वागले पाहिजे असे तिच्या निरागस मनावर लहानपणापासूनच वारंवार बिंबवले जाते. एक ना एक दिवस तिला लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जायचे तिथं तिला आईवडिलांची प्रतिष्ठा जयापची आहे.
लग्न झाल्यावर अनेक भूमिका पार पाडताना तिला प्रत्येकाचे मनही जपावे लागते. स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून इतरांसाठी ती जगत असते. कधी घर टिकवण्यासाठी अन्याय सहन करते, तर आईवडिलांसाठी त्यांना त्रास नको म्हणून नवऱ्याचा जाच सहन करते खरंतर तिची सहनशक्ती त्याग असतो. पण तिला समाजाकडून अबला, अन्याय सहन करणारी अशी विशेषणे दिली जातात. पूर्वीच्या काळी स्त्री अशिक्षित होती तिला फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच तिची मर्यादा होती. पण आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते. स्त्री ही क्षणाची पत्नी असुन अनंत काळाची माता असते. स्त्री प्रेमरूपी सागर आहे, देवाने तिला मातृत्व ही अनमोल देणगी दिली आहे परंतु ती काही कारणास्तव आई होवु शकली नाही तर तिला दूषणं दिली जातात. कधी कधी ते दोष पुरुषात असतात पण योग्य तपासणी न करता पुरूष दुसरे लग्न करून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करतात ती एक स्त्री आहे म्हणून ती एक वंशवृद्धी चे साधन समजतात. ती फक्त उपभोगाची वस्तू आहे का? तिलाही भावना, मन आहे. याचा विचार कुणीच करत नाही. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्य हवे. तिला वैचारिक स्वातंत्र्य हवे. प्रत्येक व्यवहारात तीचा सहभाग हवा. आजही कमवत्या स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य नाही तिला एक माणूस म्हणून वागणूक द्या, तिचा आदर करा !!
सुनेत्रा प्रशांत नगरकर
तालुका-जिल्हा
अहमदनगर

समन्वयक – पालघर जिल्हा
छान लेख आहे मॅडम. परीस्थिती थोडी थोडी बदलू लागली आहे. माझ्या पाहण्यातील बहुतेक घरात मुलगा मुलगी समान आहेत. किंवा कीतीतरी घरात फक्त एक कींवा दोन मुलीच आहेत पुर्विप्रमाणे मुलगाच हवा हा अट्टाहास बर्याच अंशी कमी होताना दिसत आहे हे चित्र समाधानकारक आहे.
पण आपण नमुद केल्या प्रमाणे मुलगी समाजात सुरक्षित नाहीच. रोज पेपर मधे महीलांच्या बाबतीत ज्या बातम्या येतात त्या वाचून अंगावर शहरा येतो.. हे चित्र बदलायला हवे.