Homeमुक्त- व्यासपीठबंदुकीच्या धाकाने

बंदुकीच्या धाकाने

बंदुकीच्या धाकाने
सत्तेवर तालिबान
स्वातंत्र्य हिरावले
गुलाम झाले अफगान

नरकयातना स्त्रियांना
लोक सैरावैरा पळती
बंदुकीच्या धाकाने
साऱ्या देशाला छळती.

मानवतेचा घोटूनी गळा
धर्मांध येती सत्तेवर
कुठे गेले मानवतावादी
कसे बोलेना अफगानवर

देश सोडून जाऊ म्हणणारे
त्यांचे ते शब्द आठवा
तालिबान्यांचा नंगानाच पाहण्या
या बोलघेवड्यांना पाठवा

आज कळले साऱ्यांना
किती महान हिंदुस्तान
धर्म नांदती सुखाने
तिरंगा आण-बाण शान

स्वातंत्र्य चिरायू ठेवूया
जपूया माणुसकीची नाती
वंदन करतो भारतमातेला
पवित्र आहे इथली माती…

कवी -किसन आटोळे सर
वाहिरा ता आष्टी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular