Homeघडामोडीबर्ड फ्लूच्या ; १५ दिवस बंद ;कोंबड्या आणि अंडी विक्री

बर्ड फ्लूच्या ; १५ दिवस बंद ;कोंबड्या आणि अंडी विक्री

मध्य प्रदेश – मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील प्रशासनाने पुढील १५ दिवसांसाठी कोंबड्या तसेच अंडी विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मंदसौरमध्ये अनेक मृत कावळे आढळून आल्यानंतर बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून कोंबड्या आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये २३ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान ३७६ कावळ्यांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे १४२ कावळे इंदूरमध्ये मृत्यूमुखी पडलेत. तर दुकानांना १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेल्या मंदसौरमध्ये १०० मेलेले कावळे आढळले होते. आगर-माळवामध्ये ११२, खरगोन जिल्ह्यात १३ तर सीहोरीमध्ये ९ कावळ्यांचा मृत्यू झालाय. इंदूरबरोबरच मंदसौर येथे सापडलेल्या मृत कावळ्यांच्या नमुन्यांचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. या अहवालामध्ये पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूच्या विषाणुमुळेच झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून ज्या ठिकाणी मेलेले कावळे आढळे आहेत तिथे विशेष पथकं तैनात करण्यात आली आहे. पशुसंवर्धन मंत्री प्रेम सिंग पटेल यांनी राज्यातील आपत्कालीन

यंत्रणेअंतर्गत इंदूरमध्ये बर्ड फ्लूसंदर्भातील नियंत्रण कक्ष उभारण्यात आलं आहे. केरळमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. केरळने बर्फ फ्लूची प्रकरणं समोर आल्यानंतर या आपत्तीला राज्यास्तरीय आपत्तीचा दर्जा देत असल्याची औपचारिक घोषणा केलीय. मध्य प्रदेशमधील मंदसौर आणि कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये कोंबड्यांचे मांस आणि अंड्यांची दुकान सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ आज केरळमधील कोट्टायम आणि अल्लपुझा या दोन जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा राज्य सरकाने जारी केला आहे. हिमाचलमधील स्थलांतरित पक्षांचा मृत्यूही बर्ड फ्लूने झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तिथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोट्टायम जिल्हा प्रशानाने दिलेल्या माहितीनुसार नींदूरमधील एका बदकांच्या पोल्ट्रीमध्ये बर्फ फ्लूचा संसर्ग झालेले पक्षी आढळून आले आहेत. येथे १२०० हून अधिक बदकांचा मृत्यू झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलप्पुझा जिल्ह्यातील कुट्टानद येथील काही पोल्ट्री फार्ममध्येही बर्ड फ्लूची प्रकरण समोर आळी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बर्फ फ्लू झालेले पक्षी आढळून आल्याने संसर्ग रोखण्यासाठी ४८ हजार पक्षी मारण्याचे आदेश जारी करेण्यात आले आहेत. या पक्षांचा मोबदला देण्यासंदर्भात मुख्यमंत्राशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल असे के. राजू यांनी सांगितले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular