Homeमाझा अधिकारबांधकाम कामगार आणि दारू

बांधकाम कामगार आणि दारू

दारू सोडा आरोग्याशी नात जोडा. निरोगी रहा विविध विनाशकारी रोगांपासून वाचा. जस आपण आज वागता तसेच उद्या आपली मुल वागणार म्हणजे बा दारुडा पोरग दारूड. अस नको. आजच विचार बदला. कारण दारू विक्री व्यवसाय करणारा कधीच दारू पित नाही म्हणून तो मालक आहे आणि आपण गुलाम झालो आहे
बांधकाम कामगार म्हणलं की व्यसनी अडाणी गरजू अशिक्षित मिळेल ते काम करणारा मिळेल ती मजूरि घेणारा ठेकेदार इंजिनिअर यांचा अन्याय सहन करणारा. गरिबी मुळे शिक्षण नाही. शिक्षण नसल्यामुळे नोकरी नाही. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारा. तो व्यक्ती म्हणजे बांधकाम कामगार होय.
बांधकाम कामगार.क्षेत्रात आज आपल्या लोकसंख्येच्या ६५ टक्के लोक याच व्यवसायावर आपला व आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवतात. म्हणजे. सरकारला सर्वात मोठा आर्थिक टॅक्स हा बांधकाम क्षेत्रातून ज्याला बांधकाम कामगार व्हायचे आहे त्यासाठी कोणतीही परिक्षा नाही. कोणतेही अनुभव सर्टिफिकेट लागतं नाही शिक्षणाची अट नाही त्यामुळे ६५ टक्के लोक या बांधकाम क्षेत्राकडे वळतात. ग्रामीण भागातून येणारा लोकांचा लोंढा हा शहरांत बांधकाम कामगार म्हणूनच काम करतात. त्यामुळे वाढणारी गुंडगिरी बेकायदा अवैध व्यवसाय. व्यसनी. अशा विविध कारणानें ही जनता ग्रासली आहे
दारु हा शब्द मधीरा. सुरा. सोमरस अशी मनमोहक नाव असणारा एक शब्द आहे. जुन्या काळात काळया कुजलेल्या गुळापासून. नवसागर. युरिया. भाबळीची साल. असे एक मिश्रण तयार केले जाते ते ठराविक दिवसासाठी कुजणयासाठी सोडले जाते त्यात साप उंदीर घुशी पाली. असे एक नाही अनेक प्राणी पाडतात आणि मरतात आणि अशा मिश्रणापासून मानवी आरोग्यास हानिकारक असणारी दारु तयार केली जाते. आणि लोक बांधकाम कामगार दिवसभर उन्हात राबून चार पैसे गाठीला बांधायचे सोडून त्याच पैशांत दारु सारखं विष विकत घेतात किती वाईट आहे बघा. बांधकाम कामगार दारुच्या अधिन झाले आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त दारूच्या नशेत असणारे बांधकाम कामगार मी बघितले आहेत. यात बांधकाम व्यावसायिक व ठेकेदार इंजिनिअर. यांना कामगारांची गरज असेल तर सकाळी त्याला दारू पिण्यासाठी पैसे देऊन नंतरचं कामांवर न्यावे लागते. बांधकाम कामगार यांचे असे मत आहे की दिवसभर कामांचा कंटाळा घालविण्यासाठी आम्ही दारू पितो. काहीजण म्हणतात आम्हाला लय टेन्शन आहे म्हणून आम्ही दारू पितो. काहीजण मुल ऐकत नाहीत म्हणून आम्ही दारू पितो. काहीजण कर्जबाजारी पणामुळे दारू पितात. काहीजण बायकोच्या त्रासामुळे किंवा बेजबाबदार वागण्यामुळे दारू पितात. तर काहीजणांन खास चैनी करायची म्हणून पीतात. अशी एक नाही अनेक कारणे लोक सांगतात पण हा सर्व खेळ आहे ते आपल्या मित्रांची कुटुंबाची. फसवणूक करत नाहीत तर ते सवताची फसवणूक करत असतात.
काॅंकरेट.गॅंग म्हणजे येथे एक ठेकेदार असतो. रोज सकाळी दारूच्या अड्ड्यावर असणारे बांधकाम कामगार गोळा करून त्यांना दारू पाजून कामांवर नेतात आणि काम झाल्यावर ठरविल्याप्रमाणे पगार न देता घालविले जाते. या अशा कामांवर जाणारे बांधकाम कामगार यांची नोंदणी पोलिस स्टेशनला करणे आवश्यक आहे पण कोणीही करत नाही. त्यांचा इनसुरनस करणे गरजेचे आहे पण कोणीही करत नाही. याचयामगचे कारणं सांगितलें जाते ते म्हणजे हे कामगार परगावचे आहेत आमच्याकडे काय कायम आहेत का ? मग यांच्यासाठी आम्ही काही करू शकत नाही. असे मत या ठेकेदार लोकांचे असते. यामध्ये अंगावर पैसे देण्याचे नविन खुळ आल आहे कारणं या कामगारांना दारूचं व्यसन आणि दुसरें कोणतेही काम येत नाही मग एखाद्या ठेकेदार यांचेकडून अंगावर पैसे घ्यायचे. मग काय या कामगारांचा दारुचा खर्च आणि पगार कमी यामुळे या बांधकाम कामगार याचे अंगावर असणारे पैसे कसे फिटणार मग त्या कामगारांचे मरेपर्यंत हेच काम करायचे. पैशासाठी कामगारांना माराहाण. बांधून मारणे. शिविगाळ. रात्री अपरात्री घराकडे जाणे. दम देणें जीवे मारण्याची धमकी. पोलिस स्टेशनला गेला तर जीवे मारण्याची धमकी. . त्यांच्या बायकांवर वाईट नजर तुझ्या नवरयाने अंगावर पैसे घेतले आहेत ते तुला फेडावे लागतिल नाहितर या महिलांच्या कडे शरिरसुखाची मागणी करणारे नराधम याच धंद्यात आहेत. कामगाराच दारूडा नाही हे ठेकेदार सुध्दा दारु पितात पण ते बार मध्ये. महागडी दारु पितात यासाठी येणारा पैसा हा बांधकाम कामगार यांच्या घामातून येतो.कामावर काम चालू असताना काही अपघात झाल्यास.दुखापत झाल्यास त्यासाठी येणारा औषधांचा खर्च व जोपर्यंत तो बांधकाम कामगार काम करू शकत नाही तोपर्यंत त्याचा पगार. ज्या ठेकेदार कंत्राटदार यांनी कामाला घेऊन जाणारया वर आहे. पण आज कोणीही बांधकाराला ओळख सुद्धा देत नाही आजचं निर्णय करा आणि ज्यांच्याकडे कामाला जाताय तेथे असा कोणताही प्रकार घडल्यास तात्काळ पोलिस स्टेशनला तक्रार करा. फक्त दारू पिऊ नका क्रांकरेट कामांवर जाणारे बांधकाम कामगार हे काम करत असताना बरेच कामगाराचा कामांवर मृत्यू झाला आहे अशी बरिच प्रकारणे आहेत. पण आजपर्यंत या बांधकाम कामगार यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही पोलिस स्टेशनला तक्रार केली नाही का ? मला कळत नाही. बांधकाम कामगार यांच्या नशिबाला हे सर्व येते ते म्हणजे फक्त आणि फक्त दारूमुळे
दारूचे व्यसन असणा-या व्यक्तीला समाजात किंमत नाही मुलबाळ पत्नी सगेसोयरे यांच्यात किंमत नाही. कारणं रोज संध्याकाळी घराकडे दारू पिऊन येणारे रस्त्याला पडत पडतं येताना आपण बघतो. आणि म्हणतो आज काय पगार झालाय वाटत ? आज काय बाजार आहे वाटतं ? मग त्या घरातील महिलांना व मुलांना एकादा माणूस सांगतं येतो की तुमचा माणूस अमुक ठिकाणी दारू पिऊन पडला आहे काय वाटतं असलं त्या जीवाला. उसने पैसे घेऊन. कर्ज काढून. घरातील भांडी कुंडी विकून. चोरी करून संडास धुवून. कष्टाची कामे करून. साफसफाई करून. वेळ पडल्यास घरातील बायको मुलं कामाला ठेवून स्वता. दारु पिणारे. असं एक नाही अनेक प्रकारची कामे करून दारू पिणारे मी बघितले आहेत. आणि याचं प्रमाण जास्त आहे ते म्हणजे बांधकाम कामगारांत वाईट आहे
आज शासनाकडून देशी विदेशी दारूला लाईसनस देवून विक्री करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे शासन सुध्दा पूर्ण दारूबंदी कायदा अंमलात आणत नाही. काही ठिकाणी उलटी बाटली अशी महिला आंदोलन झाली पण त्याला सुद्धा जोर लागला नाही. त्यात सुध्दा मोठ्या प्रमाणात राजकारण आल आणि अशी आंदोलने करणार्या महिला राजकारणात गेल्या आणि आंदोलन मोर्चा हे सर्व शांत झालयं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांच्यासाठी १९ कामगार महिलांना मुलांना जशा विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात तसेच मंडळाकडून व्यसनमुक्ती उपचारासाठी योजना आहे पण आज कोणताही बांधकाम कामगार या योजनेकडे वळत नाही आणि वळलेला नाही. म्हणजे मंडळांचा बांधकाम कामगार यांना व्यसनापासून दूर करण्यासाठी असणा-या प्रयत्न फोल ठरला आहे. मंडळाने सर्वांचे चेक अप करण्याची गरज आहे किंवा मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांचा दाखला अनिवार्य करण्यात यावा कारणं आत्ता अटल विश्व कर्मा विशेष बांधकाम कामगार आरोग्य तपासणी अभियान अंतर्गत बांधकाम कामगार यांच्या विविध टेस्ट करण्याच्या मागच कारणं आहे ते म्हणजे बांधकाम कामगार दारू पितो का? जर एखाद्या कामांवर बांधकाम कामगार याचा काही अपघात झाला तर अभियान मध्ये करण्यात आलेल्या विविध टेस्ट मध्ये अल्कोहोल चे सुध्दा टेस्ट होते त्यामुळे मंडळाकडून बांधकाम कामगार कामावर असताना अपघातात मृत्यू झाल्यास असणारा पाच लाख रुपये इतकी शासनाची त्यांच्या कुटुंबाला मिळणारी रक्कम मिळणारं नाही म्हणजे दारू किती वाईट आहे बघा ? महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र ही योजना शासनाने अंमलात आणली होती पण त्याचा सुध्दा काही उपयोग झाला नाही.
आजचं दारू सोडा आरोग्याशी नातं जोडा. निरोगी रहा कारणं दारु म्हणजे गुलामगिरी.


अहमद नबीलाल मुंडे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular