11 पैकी 10 जागा जिंकून एकतर्फी सत्ता....
कोल्हापूर:- ( शिवाजी यादव ) – कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेची स्थापना 1921 साली झाली असून संस्थेने शतक(100) वर्ष पूर्ण केली आहेत
सदर संस्थेचा त्रेंवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून. मा. आसिफ शेख व ऑफिस सेक्रेटरी रमेश पाटील यांनी काम पाहीले .
169 व्यापारी सभासद संख्या, खूप जुनी व आदर्श असणारी लक्ष्मीपुरी येथील धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेचा निवडणूक कार्यक्रम चालू झाल्यामुळे बाजारपेठेत निवडणुकीचे वारे वाहू लागले होते.
संस्थेच्या निवडून द्यायच्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर 24 उमेदवारांनी 24 उमेदवारी अर्ज दाखल केले होते छाननीनंतर अर्जमागे घ्यायच्या दिवशी 2 उमेदवारानी अर्ज मागे घेतलेने निवडून द्यायच्या 11जागेसाठी दोन पॅनलचे एकूण 22 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले.
संस्थेच्या लक्ष्मीपुरी येथील कार्यालयामध्ये सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली दुपारी 12 वाजेपर्यंत 169 पैकी मयत 10 वगळता 144.मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानाच्या ..85 % इतकी मतदानाची नोंद झाली.
दुपारी 1 नंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.2 टेबलवर. 6 फेरी मतमोजणी पार पडली
महालक्ष्मी पँनेलचे नेतृत्व श्री विवेक शेटे यांनी केले. तर विरोधी छत्रपती राजाराम पँनेलचे नेतृत्व श्री नयन प्रसादे यांनी केले.होते.
कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेच्या निवडणूकीत श्री.महालक्ष्मी पँनेलने 11 पैकी 10 जागा जिंकून बाजी मारली.विद्यमान अध्यक्ष श्री नयन प्रसादे यांच्या एकमेव अमर क्षिरसागर यांना काम करण्याची संधी मिळाली. छत्रपती राजाराम पँनेलला .1 जागेवर समाधान मानावे लागले तर महालक्ष्मी पॅनेलच्या डॉ. दिलीप चौगुले यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.
विजयी उमेदवार –
नाव. मते
कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्था निवडणूक
नाव. मते
1) परिख संजीव. 93
2) लिंबेकर सुरेश. 89
3) नष्टे विवेक. 88
4) सावर्डेकर वैभव. 87
5) कागले विजय. 86 6)मिठारी श्रीनिवास. 86
7) शेटे विवेक. 84
8) तपकिरे किरण. 84
9) लकडे राजेंद्र. 82
10) चव्हाण धन्यकुमार. 80
11) क्षिरसागर अमर. 72
मुख्यसंपादक