१. स्वयंसेवी संस्था व्यवस्थापनात संवादाचे धोरण :
उद्देश : या धरोनाचा मुख्य उद्देश स्वयंसेवी संस्थामध्ये संवादासाठी होणारा खर्च शक्यतो टाळणे व कमी करणे हा आहे. “दूरध्वनी” छोट्या अंतरावरील संवादासाठी अत्यंत उपयुक्त व जलद साधन आहे परंतु लांबच्या अंतरासाठी जास्त प्रमाणात खर्च होऊ शकतो.
जलद संवाद साधण्यासाठी आणखी साधन म्हणजे कुरियर, फ़क्ष आणि ईमेल वरील दिलेल्या साधनांपैकी ईमेल हि स्वस्त व सर्वात जलद अशी सुविधा आहे. हल्ली बर्याच स्वयंसेवी संस्था जिल्ह्या व राज्या बाहेरील संवादासाठी ई-मेल वापरणे पसंद करतात.
इंटरनेट सुविधा जर आपल्या कार्यालयात उपलब्ध असेल, तर कार्यालयीन कामासाठी त्याचा उपयोग करणे अतिशय महत्वाचे कारण हे सुद्धा संवादाचं एक असं साधन आहे. ज्याची व्याप्ती फार मोठी आहे.
२. मार्गदर्शिका :
▶️ दूरध्वनीचा वापर करतात संभाषण थोडक्यात उरकणे व तो दूरध्वनी इतरांसाठी उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.
▶️ साधारणतः दूरध्वनी हा कार्यालयीन कामासाठीच वापरावा. जर त्याचा वापर कार्यालयीन कामा व्यतिरिक्त झाला तर त्याचे शुल्क त्या कर्मचाऱ्यांकडून आकारण्यात यावे.
संवादावरील खर्च कमीतकमी होण्याच्या दृष्टीने ई-मेल चा जास्तीत जास्त वापर असावा.
▶️ संस्था अंतर्गत किंवा संस्था बाह्य होणारे संवाद/ संभाषण याची एक प्रत कार्यालयात तपशीलवार असली पाहिजे.
▶️ फॅक्सद्वारे छोटे संदेश पाठवण्याची काळजी घ्यावी. अगदीच तातडीने पाठवायचे असेल तर फार मोठे संदेश फकस द्वारे पाठवावे. फकस हा जास्त काळ टिकत नसल्याने त्याची आणखी एक प्रत (झेरॉक्स) जरूर काढावी. व महत्वाची एक प्रत ऑफिस रेकॉर्डसाठी ठेवणे.
३. स्वयंसेवी संस्थेमध्ये प्रभावीपणे संवाद कसा साधावा ?
प्रभावीपणे संवाद साधणे म्हणजे पाहणे, अवलोकन करणे, विचार करणे व अनुभवणे. आपण जेव्हा बोलतो किंवा गप्प असतो, हसतो किंवा चिडतो तेव्हा आपण एक प्रकारचा संवाद साधत असतो. संवाद हि कला आहे ज्यामध्ये भाषा, शब्द, खाणा-खुणा, संकेत; भावना, विचार, मुल्य इत्यादींचा समावेश असतो.
४. संवाद म्हणजे संदेश माहिती, धाडणे व स्वीकारणे, त्यावर विचार करणे, प्रत्युतर करणे व समर्पक अशी क्रिया करणे.
५. संवादाविषयी जनमाणसात असलेले काही पूर्वग्रह :
१. संवाद हि अशी गोष्ट आहे. जी सर्वाना माहित आहे.
२. संवाद हा आपोआप समजून घेतला जातो.
३. आपण शब्दाद्वारे संवाद साधतो.
४. संवाद हा नेहमी जाणून-बुजून व पूर्ण विचारांती केला जातो.
५. स्वतःच्या संवादावर आपण पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकतो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत
मुख्यसंपादक