मित्रांनो रशिया ने युक्रेन वर आक्रमण केले त्याला २ दिवस होत आहेत बघता बघता कथित बलाढ्य अमेरिका व युरोपच्या अब्रुच्या चिंध्या करत रशियन सैन्य युक्रेनच्या राजधानी बाहेर येऊन ठेपल आहे आता युक्रेनचे पतन हि औपचारिकता आहे युनो या नोनो संघटनेत आज रात्री ह्यांवर मतदान होणार आहेआणि आज अमेरिका व अन्य देश भारताला नैतिकतेचे डोस पाजत रशियाचा निषेध ठरावाच्या बाजूने मतदान करावे म्हणून दबाव आणत आहेत आंतरराष्ट्रीय राजकारण फक्त नैतिकते वर चालत नाही त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असते त्यासाठी हा धागा
पहिले पाहूया युक्रेन चे भारताविषयीच्या आज उमालून आलेल्या प्रेमाबद्दल
१ १९९८ साली भारताने अणुस्फोट घडवून आणले तेव्हा भारतावर निर्बंध घालणारा होता युक्रेन
२ युनो मध्ये भारताविरुद्ध मतदान करणारा होता युक्रेन
३ पाकिस्तान ला हत्यारे विकणारा आहे युक्रेन
४ भारताला सिक्युरिटी कॉन्सिल मध्ये सहभागी करू नये म्हणणारा देश युक्रेन
५ २०१९ साली युनो मध्ये काश्मीर प्रश्नी भारताविरुद्ध मतदान करणारा देश युक्रेन
थोडक्यात आज त्यांची गरज आहे म्हणून मोदी मोठे नेते आहेत त्यांनी हस्तक्षेप करावा असे म्हणणारा त्याच्या मित्रांनीच ज्याला दगाफटका केलाय असा आजचा युक्रेन
आता रशिया कडे वळूया भारत जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा मदतीला आलाय फक्त रशिया
आज पाहूया ५० वर्षांपूर्वीची घटना जी विस्मृतीत गेली आहे वर्ष होते १९७१ महिना डिसेम्बर भारत तेव्हा पाकिस्तान विरुद्ध युद्धात होताजे बांगला मुक्तीचे युद्ध होते पाकिस्तान चा साथी अमेरिकेने भारताला धमकी दिली कि युद्ध थांबवावे अन्यथा वाईट परिणाम होतील ज्याने सावध होऊन भारताने रशियाला मदतीचा SOS पाठवला जेव्हा पाक पराभव होणार हे दिसू लागले तेव्हा किसिंजर ने राष्ट्रपती निक्सन ला सांगून
अमेरिकेचे सर्वात मोठे आण्विक विमानवाहू नौका USS ENTERPRISE बंगालच्या उपसागरात पाठवायचे ठरवले हे जहाज त्यावेळी जगात सर्वात मोठे ७५००० टन वजनी आणि ज्यावर ७० हुन जास्त विमाने असू शकतात असे होते याच्या तुलनेत आपल्याकडे होते २०००० टन वजनी INS विक्रांत ज्याची क्षमता २० विमानांची होती अमेरिकन जहाजाचा हेतू होता बांगला देश मुक्त होणे थांबवणे लवकरच भारताला अजून १ वाईट बातमी मिळाली
रशियन गुप्तहेर खात्याने आपल्याला सावध केले कि ब्रिटिश नौदल हि त्यांची खूप आरमारी जहाजे अरबी समुद्रात पाठवत आहे ज्याचे नेतृत्व HMS EAGLE व कमांडो कॆरियर ALBION करत आहे ब्रिटिश व अमेरिकी नौदलाचा दुहेरी डाव होता कि भारताची दोन बाजूंनी कोंडी करायची अशा तर्हेने १९७१ साली जगातील २ आघाडीचे लोकशाही देश जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला धमकावत होते तेव्हा दिल्लीने तातडीचा निरोप मॉस्को ला पाठवला रशियन नौदलाने ताबडतोब १६ आरमारी जहाजेआणि ६ आण्विक पाणबुड्या व्लॅडिवॉस्टॉक हुन रवाना केल्या ज्याचा हेतू होता USS ENTERPRISE ला अडवणे ऍडमिरल एन कृष्णन जे त्यावेळी नौदलाच्या पूर्व विभागाचे मुख्य होते त्यांनी त्यांचे पुस्तक NO WAY BUT SURRENDER मध्ये लिहिले आहे कि त्यांना भीती वाटत होतीकि अमेरिकन युद्ध नौका चिटगॉन्ग बंदरावर हल्ला करेल आणि त्यांनी त्यासाठी मारो व मरो या इर्षेने प्लॅन हि बनवला होता डिसेंबर १९७१ चा दुसरा आठवडा महाकाय अमेरिकी युद्ध नौका बंगालच्या उपसागरात येऊ लागली आणि ब्रिटिश युद्ध नौका अरबी सागराकडे निघाल्या जगाचा श्वास रोखला गेला कि आता विश्व युद्ध पेटते काय पण अमेरिकी युद्ध नौका अनभिद्न्य असतानाच अचानक बंगालच्या उपसागरात त्यांनी रशियन आण्विक पाणबुड्या पाहिल्या ज्या त्यांची वाट अडवून होत्या अमेरिकन युद्ध नौकेवरील सैनिकांना धक्का बसला ऍडमिरल गॉर्डन ने कळवले
आपल्याला उशीर झाला रशियन आधीपासूनच इथे आहेत अमेरिकन आणि ब्रिटिश नौदलाने माघारी जाण्याच निर्णय घेतला
आज हि घटना विस्मृतीत गेली आहे त्याला या निमित्ताने दिलेला हा उजाळा
आणि आपला सच्चा मित्र कोण हे दाखवून देण्यासाठी
लिहिलेला हा धागा
- सो. मी
मुख्यसंपादक