Homeकला-क्रीडामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऋतुजा भोसले, स्वप्नील कुसाळे या खेळाडूंचे अभिनंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऋतुजा भोसले, स्वप्नील कुसाळे या खेळाडूंचे अभिनंदन

आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस, नेमबाजीत पटकावले सुवर्णपदक

मुंबई, दि. ३०:- चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमधील मिश्र दुहेरी गटात महाराष्ट्राच्या ऋतुजा भोसले हिने व पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये स्वप्नील कुसाळे याने सुवर्णपदक पटकावले आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोघा विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

“महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी सुरूवातीपासूनच या क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऋतुजाने टेनिसमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वप्नीलने देखील नेमबाजीचा उत्कृष्ट कामगिरीचा आलेख उंचावणारी कामगिरी केली आहे. या दोघांनीही सांघिक खेळात जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर भारताला पदकांची कमाई करून दिली आहे, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे”, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी या यशासाठी ॠतुजा व स्वप्नीलचे तसेच त्यांच्या प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे व दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular