गवसे ( प्रतिनिधी ) – मराठी उद्योजक मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने आजरा तालुक्यातील दुर्गम भागातील विद्या मंदिर किटवडे धनगरवाडा या शाळेतील इयत्ता पहिली ते नववी च्या एकूण १६ विध्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे.
यावेळी शाळेचे मुख्याद्यापक उत्तम कोकितकर सर यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच शाळेतील विध्यार्थी यांनी समूहगीताने अतिथी यांचे स्वागत केले. तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी मध्ये गीत व नाटिका सादर केल्या. त्यानंतर मंडळाच्या वतीने सर्व १६ विध्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने सर्वाना चहा नाश्ता ची ही व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी मंडळाच्या वतीने परशराम पाटील, संदेश पाटील, किरण बेलगुंदकर, प्रवीण कातकर, अंकुश पाटील, सिद्धार्थ हसबे, आदित्य पाटील, शंकर ढोकरे, अनिकेत पाटील, योगेश सावंत, संदीप पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमच्या शेवटी कोकितकर यांनी सर्वांचे आभार मानले.

मुख्यसंपादक
khup chan upkram