Homeसंपादकीयमहानोर बाई गेल्या अन.. कवितेचा मळा पोरका झाला

महानोर बाई गेल्या अन.. कवितेचा मळा पोरका झाला

कविवर्य महानोर दादा यांच्या धर्मपत्नी सुलोचनाताई महानोर यांचं वृद्धापकाळाने निधन झाल्याचं समजलं आणि मनपाखरू बेचैन झालं डोळ्यासमोर पळसखेड च्या मळ्यातल वैभव आल ,तो नुसता पानाफुलांचा फळांचा मळा नव्हता ,तो मळा होता माणुसकीचा, शब्दांचा कवितेचा ,आणि येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व अतिथींच्या आदरातिथ्याचा. असा हा आंतरिक भावनांचा मळा आज बाईंच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं पोरका झाला , दादांनी पुस्तकाची अर्पण पत्रिकेमध्ये लिहून ठेवलंय की झाडाच्या आधाराने वेल वाढते इथे मात्र वेलीच्या आधाराने झाड वाढलाय ,खरंच तसं होतं दादांच्या परीक्षेच्या काळात मानसिक सामाजिक प्रतिष्ठीत घरगुती अशा कितीतरी अडचणींना बाई ढालीसारख्या समोर यायच्या, दादांकडे सामाजिक ,राजकीय, साहित्यिक, शेती तज्ञ, शेतीनिष्ठ ,चित्रपट क्षेत्रातले मान्यवर, असे कितीतरी लोक येत असत त्यांची सरबराई करताना बाईनी कधीच मागेपुढे पाहिलं ,नाही प्रतिष्ठित माणसावर जितका प्रेम केलं तितकाच आमच्यासारख्या सामान्य माणसावर हि केलं, एका प्रतिष्ठित साहित्यिकाची आमदाराची बायको म्हणून त्या कधीच वागल्या नाहीत, एका शेतकऱ्याची बायको म्हणून शेतकरी बनून त्या शेती मातीत रमल्या, मोठा परिवार लेकर बाळ शेती गुरंढोरं येणाऱ्या जाणाऱ्या चा राबता हे सर्व बाईंनी सांभाळलं, आणि कवितेच विश्व दादांसाठी मोकळा करून दिल मला पळसखेड च्या मळ्यातली बाईंची पहीली भेट आठवते मी वाकोद च्या बाजारामध्ये बैल जोडी घेण्यासाठी गेलो असता, रस्त्यात दादांची भेट घ्यावी म्हणून थांबलो तेव्हा दादा आणि बाई दोघेही बाहेर लिंबाच्या झाडाखाली बसलेले होते मी जाऊन नमस्कार केला ,दादांनी मला खुणेनेच बस म्हणून सांगितलं आणि बाईंना माझी ओळख करून दिली ,तेव्हा बाई म्हणाल्या तू काय करतोस मी म्हटलं शेती करतो आणि कविता वाचतो या एका शब्दाने त्या गहिवरल्या आणि म्हणाल्या बाबा रे !जो तो कविता लिहितो आणि तू कविता वाचतो हे ऐकून मला फार बरं वाटलं ,माझ्या उत्तराने बाईंना नवल वाटलं त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला आशीर्वाद दिला, तो मायेचा हात आणि तो आशीर्वाद मी अजुनही अंतरात जतन करून ठेवला आहे ,बाई तुमच्या जाण्याने आम्हा सर्वांचा कवितेचा मळा पोरका झाला आहे…….

                  संतोष पाटील
              7666447112

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular