Homeघडामोडीमहावितरनाच्या कामचुकार कामगारांवर कारवाई करन्याच्या भुजबळ यांच्या सूचना

महावितरनाच्या कामचुकार कामगारांवर कारवाई करन्याच्या भुजबळ यांच्या सूचना

नाशिक :  येवला मतदारसंघात सुरू असलेली महावितरणची कामे तातडीने पूर्ण करण्यासह प्रस्तावित कामांचे प्रस्ताव सादर करावेत, तसेच कामात दिरंगाई  आणि ग्राहकांशी बेशिस्तपणे वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशा सूचना आ. छगन भुजबळ यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

भुजबळ फार्म येथील कार्यालयात येवला मतदारसंघातील कृषी धोरण २०२० एसीएफ अंतर्गत मंजूर असलेल्या महावितरणच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, मनमाडचे कार्यकारी अभियंता एस. ए. तडवी, राजाराम डोंगरे, लासलगावचे उपकार्यकारी अभियंता पी. एन. सोनवणे आदी उपस्थित होते. 

यावेळी भुजबळ यांनी येवला आणि निफाड तालुक्यातील नगरसूल तसेच कोटमगाव क्षमता वाढ, अंगुलगाव, बल्हेगाव, कुसूर, सोमठाणदेश तर निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव, मरळगोई येथील अतिरिक्त पाच एमव्हीए रोहित्र, चिंचोडी औद्योगिक वसाहत, पिंपळगाव जलाल येथे नवीन विद्युत उपकेंद्र, भरवस फाटा येथे नवीन उपकेंद्र, येवला येथे १० एमव्हीएचे रोहित्र बसविणे, येवला ग्रामीणमध्ये ३५ नवीन रोहित्रे, येवला शहरात २३ नवीन रोहित्रे, सारोळा, विंचूर, वाकद येथे नवीन रोहित्र बसविणे यासह प्रस्तावित जउळके येथील नवीन विद्युत उपकेंद्र, मानोरी येथील नवीन फिडर या विविध कामांचा आढावा घेतला.

नगरसूल, अंगूलगाव, मरळगोई, खडक माळेगाव येथील विद्युत उपकेंद्राची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सदर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी दाखल करण्यात आले आहेत. येवला ग्रामीण आणि शहरी भागात नवीन रोहित्रांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. देवगाव, लासलगाव परिसरातील ३६ रोहित्रांचे काम पूर्ण झाले असून मानोरी येथे नवीन फिडरचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी भुजबळ यांना दिली.

लासलगाव-विंचूरसह १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्यास पाण्याचा दाब वाढून गळतीचे प्रमाण वाढते. पाणी पुरवठा सुरळीत राहण्याठी २४ तास वीज पुरवठा सुरु ठेवण्यात यावा, अशा सूचना भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना याआधी केल्या होत्या. या ठिकाणी विजेचे संयंत्र बसविण्याचे काम त्वरेने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular