Homeवैशिष्ट्येमी पाहिलेले बाळासाहेब ठाकरे

मी पाहिलेले बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेबांच्या २३ जानेवारी जयंती निमित्त

वृत्तपत्र विक्रेत्याच्या आयुष्यातील न विसरु शकणाऱ्या अविस्मरणीय दिवसाचे मनोगत !

    एका सर्वसामान्य वृत्तपत्र विक्रेत्याला भेटलेले अविस्मरणीय बाळासाहेब . दिनांक १७ नोव्हेंबर २०१२ हा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. या दिवशी एका धगधगत्या सूर्याचा अस्त झाला आणि तो सूर्य म्हणजे सन्माननीय हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. साहेबांची एका सर्वसामान्य वृत्तपत्र विक्रेत्याला भेट होणे म्हणजे अशक्यच पण ते माझ्या भाग्यस आले म्हणुन मी स्वतःला नशीबवान समजतो. या भेटीचे औचित्य होते बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचा परिवर्तन सन्मान सोहळा, या सोहळ्यात साहेबांना "जीवनगौरव" पुरस्कार जाहिर झाला. परंतु प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे साहेब अनुपस्थित राहिले. या सोहळ्यात प्रमुख उपस्थिती माननीय शिवसेना जेष्ठ नेते व आमदार श्री सुभाष देसाई, जेष्ठ पत्रकार अशोक पानवलकर, गिरिष कुबेर, संजीव साबळे, पद्मभुषण देशपांडे व इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमास साहेबांची अनुपस्थिती असल्याने दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवशी दुपारी साहेबांना त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेटण्याची वेळ ठरली. हा दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात भाग्याचा दिवस, मला साक्षात प्ररमेश्र्वराला भेटण्याचा योग आला. मी पहिल्यांदाच मातोश्रीवर गेलो होतो बाळासाहेबांनी आमचे अगत्याने स्वागत केले. साहेबांनी प्रत्येकाची व्यक्तीगत ओळख करुन घेतली. आम्ही सर्वसामान्य वृत्तपत्र विक्रेते असुनसुध्दा प्रत्येकाची आपुलकीने विचारपुस करुन शुभ आशिर्वाद दिले. ज्यावेळी महानगर पालिका कर्मचारी व पोलिस वृत्तपत्र विक्रेत्याला फेरिवाला समजुन विनाकारण त्रास देत होते, त्यावेळी साहेबांनी दै.सामना व मार्मिक साप्ताहिका मधुन सिंहगर्जना केली, खबरदार वृत्तपत्र विक्रेत्यांना त्रास दिलात तर! वृत्तपत्र विक्रेता हा सामान्य फेरिवाला नसुन तो समाज प्रबोधनाचे काम करत आहे. त्यावेळी साहेब जसे आमच्या पाठीशी उभे होते, तसेच त्यावेळी मार्गदर्शनास्पद बोलले की तुमची एकजुट कायम ठेवा. मी सदैव तुमच्या पाठीशी राहिन असा आत्मविश्वास आम्हाला दिला व त्यांनी आमच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देखील केली. सध्याच्या कठीण परिस्थितीशी कसा सामना करावा याबद्दल मार्गदर्शन दिले. तसेच आत्ताची युवा पिढी सोशल नेटवर्किंगच्या माध्यामातुन वाया कशी जात आहे त्याबद्दल चिंता व्यक्त केली. मुंबईत कोणत्याही दैनिकाचे प्रकाशन व इतर काही समस्या यांची चर्चा केली. तसेच साहेबांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. साहेबांसोबत नकळत पाऊणतास कसा निघुन गेला काही कळलंच नाही खरंच साहेबां बरोबरचा तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. मला साहेबांचा मनमोकळेपणा आणि कणखरपणा खुप भावला. ही भेट माननिय शिवसेना जेष्ठ नेते श्री सुभाष देसाई साहेब व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघामुळे शक्य झाली. त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहिन व अशी ही बाळासाहेबांची भेट होणे यापुढे शक्यच नाही याचे दु:ख आयुष्यात कायम राहिल. आज आपल्यात साहेब नाहीत पण त्यांचे विचार व बहुमुल्य मार्गदर्शन आपल्या सोबत आहेत आणि यापुढे ते कायम राहतील. परंतु अवघा वृत्तपत्र विक्रेता पोरका झाल्याचे दु:ख कायम राहिल!

  लेेेख-: जीवन विठोबा भोसले
  (बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ - विश्वस्त )

छायाचित्र- कु. राजुु तातेराम सुतार (भादवण ) 
     
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular