( अमित गुरव )- सर्वसामान्य लोक जातात तसे नित्यनियमाने गडहिंग्लज रिलायन्स पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आज गेलो होतो. तेवढ्यात माझं लक्ष वेधले गेले लिटर ९३ च्या किंमतीकडे आणि श्रणार्धात मनात थोडी धडकी भरली . काय प्रतिसाद द्यावा हे न समजतातच पाठीमागच्या व्यक्तीने हॉर्न केला आणि मी पुठे सरकलो. इतके कसे व केव्हा महाग झाले यावर मतभेद व भांडण करण्याचे ते व्यासपीठ नाही आणि ती जबाबदार व्यक्ती ही नाही याची जाणीव असल्याने तिथून निघालो.
पण माझ्या मनात खूप प्रश्न उपस्थित होत होते की ज्यावेळी मी शाळेत होतो तेव्हा एक -दोन रुपयांनी पेट्रोल महाग झाले की आंदोलने , मोर्चे होत होती त्या व्यक्ती आता असे का करत नाहीत ? त्यांना ही किंमत सद्या खूप कमी अथवा योग्य वाटत असेल का ? जे पेट्रोल ४० -५० रुपये होते ते ९३ रुपये झाले हेच आपल्या देशाचे अच्छे दिन आहेत का ? प्रश्न थांबत न्हवते पण ब्रेक लावून गाडी थांबवली अन ऑफिस मध्ये प्रवेश केला.
मी शरीराने फक्त ऑफिस मध्ये होतो मात्र माझे चित्त अजूनही थाऱ्यावर न्हवते . माझ्यासहकऱ्याने ते ओळखले आणि आम्ही मोहीम हाती घेतली.
आज कच्चे तेल ३७८९ रुपये (५५.६० डॉलर ) प्रति बॅरल म्हणजेच २३ रुपये प्रति लिटर इतक्या किंमतीत आहे. आजच्या प्रमाणे आम्ही २०१३ सालच्या कच्चा तेलाची किंमत पाहिली तर ८६.६५ डॉलर होती ( सोर्स- इकॉनॉमिक टाइम्स ) म्हणजेच सध्या कच्चे तेल ही त्यामानाने स्वस्त दरात मिळते. मग मात्र माझी उत्सुकता आणि तगमग वाढली आणि मुळापर्यंत जाण्याचा मानस निश्चितच केला.
मी काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर त्यांनी लॉकडाउन मुळे आमचे कंबरडे मोडले. कोरोनाच्या महामारीत आम्ही पूर्ण कोसळलो आहोत. धंदा तर गेला पण काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींनी जाऊ नयेत म्हणून आपला पगार कमी झाला तरी गप्प बसावे लागले. कारण आवाज उठवला तर नोकरी गमवावी लागेल आणि खाण्याचे सुद्धा वांदे होतील अश्या नाव न सांगण्याच्या अटीवरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
जाणून घेऊया पेट्रोल आपल्याप्रयन्त कसे पोहचते.
बेसिक , प्रोसेसिंग ३.८४ पैसे , असे करत २७.७४ पैसे मध्ये पेट्रोल तयार होते . त्यानंतर रोड केस आणि उत्पादन शुल्क वैगरे ३२.९८ पैसे , (तुम्ही लक्ष देऊन पाहिल्यास लक्षात येते की पेट्रोल तयार होण्यासाठी कमी आणि ते उत्पादन शुल्क व रोड केस साठीच जास्त पैसे खर्च होत आहेत) पेट्रोल पंप मालकाचे ३.६७ पैसे प्रति लिटर कमिशन असे एकूण ६४.३९ रुपये होतात . त्यानंतर पुन्हा VAT कँलक्युलेशन १९.३२पैसे होतात. असे होत आपल्या गाडीत पेट्रोल येते तेव्हा त्याला ९३ किंवा भविष्यात त्यापेक्षा अधिक किंमत मोजावी लागेल.
बरं मी विचार केला की इतका टॅक्स भरतोय म्हणजे माझ्या देशाला थोडीफार का असेना मदत करतोय पण डोक्यात टिकटिक वाजली आणि पुन्हा लपटॉप वर बोटे नाचू लागली तेव्हा नेटवर समजलं की ; ज्या माझ्या देशावर मी प्रेम करतो तो आज ५५६ बिलियन डॉलर कर्जात आहे ; २०१३ साली ३०० बिलियन डॉलर होता. ( आपल्या अधिक माहितीसाठी १ बिलियन डॉलर कमावण्यासाठी तुम्ही एका दिवसात ७५०० रुपये कमवले तर सरासरी २७ हजार ३९७ वर्षे लागतील.)
प्रेत्येक वेळी आपल्या मागे असलेल्या ( प्रगतीच्या दृष्टीने ) अप्रगत देशाशी तुलना करून स्वतःला मी किती महान हे दाखवण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारून त्या प्रद्धतीचे काम करावे. असे जनतेचे म्हणणे आहे.
जर पेट्रोल व डिझेल ची किंमत वाढली तर शेती साहित्य , रिक्षा किंवा इतर वाहन भाडे , तसेच इतर सेवांचे भाव वाढणार हे पर्यायाने आलेच. जर भाजीपाल्याची दर थोडा वाढला तरी काही उच्चभ्रू लोकांची आग मस्तकात जाते . त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर घुमतात. मग ही पेट्रोलवाढीच्या झळीची आग त्यांना जाणवत नसेल का? या यक्षप्रश्न आहे.
मुख्यसंपादक