Homeघडामोडीमुश्रीफ यांच्या समर्थनात शिवसेना शाखा भादवणच्या वतीने भाजप पदाधिकारी किरीट सोमय्या यांचा...

मुश्रीफ यांच्या समर्थनात शिवसेना शाखा भादवणच्या वतीने भाजप पदाधिकारी किरीट सोमय्या यांचा निषेध

भादवण ( प्रमोद घाडगे ) मंत्री मुश्रीफ यांच्या समर्थनात शिवसेना शाखा भादवणच्या वतीने भाजपा पदाधिकारी किरीट सोमय्या यांचा निषेध
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री हसनसो मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबियांवर भाजपा पदाधिकारी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खोटे व बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे तत्यहिन आरोप केले त्यांच्या निषेधार्थ भादवण गावचे सरपंच तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध सभा शिवसेना शाखा भादवण येथे आयोजित केली होती . यावेळी सभेमध्ये बोलताना सरपंच संजय पाटील म्हणाले पक्ष गट तट कोणताही असो सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे लोकप्रिय नामदार मुश्रीफ साहेब यांच्यावर बेछुटपणे आरोप करुन सर्वसामान्य माणसांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल किरीट सोमय्या यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरपंच संजय पाटील यांनी दिला. तसेच मुश्रीफ साहेब व त्यांच्या कुटुंबियांसोबत शिवसेना शाखा भादवण तसेच भादवण ग्रामस्थ येणाऱ्या काळात खंबीर पणे पाठिशी राहतील अशी ग्वाही दिली यावेळी उपसरपंच दयानंद पाटील, सुनिल मुळिक, संदिप सुतार, रणजित गाडे, पि के केसरकर विजय शिंदे, शिवाजी कुंभार, तसेच राजाराम शिंत्रे, बाळकृष्ण सुतार,श्रावण पाटील,किरण दिवेकर, जीवन पाटील, रमेश केसरकर, संजय केसरकर, प्रकाश खुळे,प्रमोद घाटगे, चंद्रकांत गोडसे संजय देसाई , विविध संस्थाचे पदाधिकारी , युवासेना शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular