Homeकला-क्रीडामेरी कॉम, तुझं आजची मँच हरणं माझ्यासारख्या माणसाला न पचण्यासारखे आहे.

मेरी कॉम, तुझं आजची मँच हरणं माझ्यासारख्या माणसाला न पचण्यासारखे आहे.

प्रिय मेरी, तुझं आजची मँच हरणं माझ्यासारख्या माणसाला न पचण्यासारखंच आहे. कारण तू कायम जिंकावीस असंच वाटतं सारखं. फक्त 3-2 च्या फरकाने हरलीस तू. फायनल रिजल्ट वेळी पंचांनी तुझ्या विरोधी प्लेयरला विजयी घोषित केलं, तेंव्हा माझ्या डोळ्यात टचकण पाणी आलं.तुही रडत होतीस पण खिलाडू वृत्तीने तू तुझ्या विरोधकाला मिठी मारलीस, तिच्या आनंदात सहभागी झालीस. यावेळी तू मॅच नाही सर्वांचं मन जिंकलस…

तुझं वय 38 आहे अगं.कदाचित तुझं हे शेवटचं ऑलम्पिक असेल,त्यामुळे रिंग मधून बाहेर पडताना तुझ्या मनात काय चालू असेल? याचा अंदाज लावू शकत नाही कोणीच.शेवटच्या राऊंडला तू दमलीस. घालमेल झाली तुझी. तेच जास्त मनाला लागलं.त्याच वेळी सगळं आठवलं… तूच भारताकडून खेळणारी पहिली पोरगी आहेस. तुझ्याकडे बघूनच अनेक पोरा -पोरींनी पंच मारण्याचं धाडस केलंयं. तू 4 पोरांची आई आणि 6 वेळाची वर्ल्ड चॅम्पियन आहेस.भारतातली पोरगी काहीही करू शकते, घरातून बाहेर पडून ती जग जिंकू शकते! हे दाखवून देऊन अनेक पोरींना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी, अनेक पोरींना घडवण्यासाठी Thank You MC Mary Kom

  • अविनाश चौगुले (पन्हाळा )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular