प्रत्येक वेळेस तुमचे आणि तुमच्या ग्राहकांचे विचार सारखेच असतील असे नाही. कदाचित तुम्ही जो विचार करताय त्याच्या एकदम विरुद्ध विचार तुमचे ग्राहक करत असतील.
अशावेळी तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालणे कठीणच असते. आपले आपल्या विचारांवर प्रेम असल्यामुळे कित्येकदा आपण इतरांच्या नजरेतून आपल्या व्यवसायाकडे पाहू शकत नाही,
आपल्या व्यवसायाचे, सेवेचे, उत्पादनाचे, आकलन करु शकत नाही. यामुळे आपल्या व्यवसायात सुधारणा होण्याची शक्यता कमी होत जाते.
पण ग्राहक सतत आपले निरीक्षण करत असतो, तो सतत आपल्याला जोखत असतो, आपली इतर व्यावसायिकांशी तुलना करत असतो, आपल्या उत्पादनाची, प्रेझेन्टेशन ची सतत दखल घेत असतो.
म्हणूनच व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर ग्राहकाच्या भूमिकेत शिरा. स्वतःला ग्राहकाच्या मानसिकतेमधे न्या. ग्राहक म्हणून तुम्हाला तुमच्याच व्यवसायाकडून काय अपेक्षित आहे याचा
अभ्यास करा. ग्राहकाला काय हवय, त्याची अपेक्षा काय आहे, त्याची मानसिकता कशी आहे अशा विविध अंगांनी अभ्यास करून आपल्या व्यवसायात योग्य ते फेरबदल केले तर तुम्ही
तुमच्या ग्राहकांच्या मनावर राज्य गाजवू शकता.
मुख्यसंपादक