प्रतिनिधी -: गुजराती , राजस्थानी लोक निघून गेले तर महाराष्ट्र मध्ये काय उरेल असे भगतसिंग कोश्यारी यांनी मत व्यक्त केले. या व्यक्तिव्याचा सर्व राज्यभर निषेध व्यक्त होत असून राज्यपाल पदाचा आम्हाला आदर आहे पण कोश्यारी याचा व्यक्तिगत पातळीवर आम्ही निषेध करतो अश्या आशायच्या पोस्ट अनेक अराजकीय लोक ही व्यक्त करीत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही अशी प्रतिक्रिया दिली. मराठी माणसां च्या कष्टातूनच मुंबई ला वैभव प्राप्त झाले असे मत त्यांनी मांडले.
राज्यपाल नेमके कोणाचे ( विशिष्ट पक्षाचे की नागरिकांचे ) व काय काम करतात हेच आजकाल लोकांना समजत नाहीये इतकेच नव्हे तर त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी तरुणाई सोशल मिडिया चा खूप वापर करताना दिसते.
मुख्यसंपादक