Homeमुक्त- व्यासपीठराष्ट्रमाता जीजाऊ आणि युवा प्रेरणा स्वामी विवेकानंद

राष्ट्रमाता जीजाऊ आणि युवा प्रेरणा स्वामी विवेकानंद

“सह्याद्रीच्या उरात
अन्यायाविरबद्ध खदखदणारी
तप्त ज्वालामुखी विर बाणी होती जीजाऊ….
संस्काराची ज्योती
अन्यायाची आहूती होती जीजाऊ…..
जाधवांची कन्या आणि
भोसल्यांची सुन होती
पराक्रमी थोर ती अन्यायाची
तिला चीड हेती….
दोन घरची ज्योती ती
सतत रयतेच्या सुखासाठी
लढत होती….
स्थापीण्या हिंदवी स्वराज्य
दिले सुपुत्र‌ जीने या महाराष्ट्रास छत्रपती आणि छावा….
त्रिवार वंदन माते तुजला वाटतं
तुझा कोटी कोटी दंडवत घ्यावा….

युवा प्रेरणा-स्वामी विवेकानंद

सर्व धर्माची शिकवण समान,
अधर्माशी लढून करा धर्माचे रक्षण,
नारीचा करूनी सन्मान तिला
मानीले ज्याने मातेसमान
धन्य धन्य ति माता जीने
घडविला पुत्र एैसा शिलवान….
हिंदू धर्माचा करूनी प्रचार आणि प्रसार…..
दिले त्यांनी जगाला आपले अनमोल विचार…
युवा प्रेरणा तो किर्तीवान
घ्यावा आजच्या तरूनांनी
आदर्श …..
घडावा प्रत्येक पुत्र येथे सुजान…..

युवा दिनानिमित्त
कविता:’व्यसनाचं वेड’
तरून बिघडला व्यसनाच्या
आहारी गेला..…
तोंडात सिगारेट हातात दारू
कुठे पडला गटारात पिवून नारू….

बापाच्या पगारीवर तरून करतात
फुकटचा नशा….
त्यांनीच केलाय त्यांच्या जीवनाचा तमाशा….

दारू पिवून आला घरी
झुलत झुलत
चुलीत लाकडं होती जळत….

घेतलं जळकं लाकूड बायकोच्या
डोक्यात घातलं
साखराच्या डब्यातलं त्यानं समदं
पैकं घेतलं….

गेला दारूच्या धाब्यावर
अजून दारू प्याला तरीबी
त्याची हौस नाही फिटली…
झाली रिकामी बाटली….

रिकामी बाटली त्यानं
मायीच्या डोक्यात फोडली…
तोडली गळ्यातली पोत तिच्या
दारूसाठी त्याला तिही नाही पुरली..

माय मारली नशेत त्यानं
गेला जेलमंधी
आज कित्येक पोरं लेका
बरबाद झालेत दारूमंधी….

व्सनी झाल्यामुळे त्यांना पोरगी
कोणी देईना….
कुंभमेळ्याशिवाय आता
दुसरा पर्याय दिसेना…

(आज खरच गरज आहे तरूनपिढीला विवेकानंदांच्या आचार विचारांची)

  • सौ.भाग्यश्री आपेगांवकर
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular