Homeसंपादकीयलहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार

लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार

दिवाळी सणामध्ये गोरगरीब माता भगिनींची ससेहोलपट पाहून फार वाईट वाटलं, एसटीचा बंद एसटीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन जनतेची फरफट आणि सरकारने बंद केले डोळे, या सर्व गोष्टींचा प्रचंड राग येतोय तीन भिन्न विचारांचा सरकार एकत्र येऊन काहीतरी समाजासाठी या महाराष्ट्रासाठी वेगळे करेल अशी आशा होती. मात्र तसं झालं नाही तीन दगडाच्या चुलीवर शेतकऱ्यांचे गोरगरीब जनतेचे वंचितांचे प्रश्न रटारटा शिजवले जात आहेत मात्र गोरगरीब जनतेला काहीच मिळत नाही. शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ करून, शेतकऱ्यांना कर्जमाफी करू. गोरगरीबांचे प्रश्न मार्गी लावू अशा कितीतरी थापा मारून हे सरकार उदयास आलं, तर काय केलं यांनी मागील सरकारच्या पायावर पाय ठेवून हे चालत आहे, असेच प्रश्न फडणवीस सरकारच्या वेळेस होते फडणवीसांना राज्य चालवत आल नाही राज्यावर कर्जाचा डोंगर वाढवून राज्य डबघाईत आणलं आणि शेतकऱ्यांना फसवलं ,त्यानंतर हे सरकार आलं मात्र प्रश्न तसेच राहिले, कळत नाही या सरकारचा चालक-मालक कोण आहे त्यांना निर्णय घेता येत नाहीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवली प्रचंड ओल्या दुष्काळाची झळ बसलेली असताना थोड्याशा पैशावर शेतकऱ्याचा बोळवण केली, त्यानंतर आता खेड्यापाड्यांना जोडणारी एसटी गोरगरिबांची माय माऊली, कर्मचारी यांच्या प्रश्नांची जाण सरकारला नाही स्वतः मात्र मंत्री झाल्यावर मंत्र्यांना गाडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा करून सरकारने आपल्या विचारांची ठेवण विचारांची जडणघडण किती खोलवर रुजलेली आहे हे दाखवून दिलं, ग्रामीण महाराष्ट्रात जर कोणी जोडला असेल तर तो एसटीने जोडलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील गरिबांची मुले एसटी मुळेच शाळा शिकले आहेत, एसटी प्रत्येक सरकारच्या वेळी फक्त रंग बदलते मात्र तिचं खरं रूप बदलत नाही एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न कधी सुटत नाहीत, कित्येक कर्मचाऱ्यांनी फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली ,आयुष्य प्रवासात घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार मिळत नाही, यांचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून या लोकांनी आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाची साधी दखलही कोणी घेत नाही, त्याच्यामुळे विरोधी पक्षाच्या लोकांनी आता तोंड खुपसायला सुरुवात केली आहे. ज्यावेळी विरोधी पक्षाचं सरकार होतं त्यावेळी अशीच परिस्थिती एसटीचे होती आजही तशीच आहे.

http://linkmarathi.com/विचार-करायला-लावणारी-मन-स/

महाराष्ट्र मध्ये हे काय चालल आहे काहीच कळत नाही कपाळकरंटे केंद्र सरकार देशाचा सत्यानाश करत असताना राज्य सरकारी त्या वाटेवर चाललंय केंद्र आणि राज्य सरकार दोघही कुचकामी ठरले असताना या सरकारातील आमदार-खासदार एकमेकांवर कुरघोडी करून निव्वळ राजकारण करत आहेत, समाजहिताचा कुठलंच काम यांना करता आलेल नाही माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून कुठलाच ठोस असा निर्णय घेतलेला नाही मला असे म्हणावे लागते की इथली प्रजा मुकी झाली आहे आंधळी झाली आहे कोणीच काही बोलत नाही कोणीच काही पाहत नाही राजा लहरी झाल्यानं प्रजा बेजार झालेले आहे.
महाराष्ट्रातील गोरगरीब जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही…

  • संतोष पाटील
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular