मुंबई (प्रतिनिधी )-: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे त्या ऍक्शन वर शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचनालयच्या कार्यालयासमोर भाजप प्रदेश कार्यालय असे बॅनर लावले आहे.
नोटीस प्रकरणी संजय राऊत यांनी ईडी भाजपचा पोपट असल्याचा घणाघात केला. पूर्वी ईडी, आयकर विभाग , सीबीआय या संस्थांना समाजात प्रतिष्ठा होती त्यामुळे यांनी कारवाई केली तर लोकांना त्यांचे गांभीर्य वाटायचे पण आता ईडी ची नोटीस येणे म्हणजे राजकीय भडास काढणे हे लोकांनी गृहीत धरलं आहे , ही त्यांची हतबलता आहे . असे राऊत म्हणाले.
त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना हा कार्यक्रम पुन्हा जोरदार होणार असे चित्र आहे.

मुख्यसंपादक