Homeकृषीशेतकरी दिन विशेष -: शेतकरी खरंच "राजा" आहे का ?

शेतकरी दिन विशेष -: शेतकरी खरंच “राजा” आहे का ?

आज २३ डिसेंबर म्हणजेच ‘राष्र्टीय किसान दिवस’…. ज्याच्यामुळे आपल्या ताटात अन्न येतं त्याच्यासाठी एकच दिवस काय तर वर्षातले ३६५ दिवस जरी “किसान दिवस” म्हणून साजरे केले तरीही कमीच पडतील !!

“जय जवान जय किसान” शाळेत असताना प्रत्येकाने हि घोषणा दिली असेल पण त्या शेतकर्‍याबद्दलचा रीस्पेक्ट आजही आपल्या मनात आहे का ? असा प्रश्न मला पडतो

ऊन, वारा, अतिवृष्टी,दुष्काळ अशा आस्मानी संकटांना मात देत, घाम गाळून, प्रसंगी कर्ज काढून खतं घालून तो आपलं शेत बहरतो. सगळं व्यवस्थित झालं, वरूणदेवांची कृपा झालीच तर भरगोस पिक हाताला येतं !

आणि मग सुरू होतो खरा संघर्ष….

http://linkmarathi.com/वृद्धावस्थेतील-मानसिक-सम/

कोणत्याही कंपणीला आपल्या प्रोडक्टची किंमत ठरवण्याचा हक्क असतो पण शेतकर्‍याला तो हक्क कधीच मिळत नाही, अडते दलाल कवडीमोलाने माल उचलतात आणि आपले खिसे भरून घेतात !

मोठमोठ्या कारखान्यांना कच्चा माल पुरवणार्‍या शेतकर्‍यांनासुद्धा “साहेबांनी” ठरवलेल्या किंमतीवर समाधान मानावं लागतं !

एखादा शेतकरी आपली भाजी विकण्यासाठी बाजारात बसलाच तर ग्राहक मंडळींना १५ रूपयांची पेंडी मोलभाव करून १० रूपयांना सुद्धा परवडत नाही पण विकएंडला ब्लॉकबस्टर मुव्ही बघण्यासाठी २००-२५० रूपयांच तिकीट परवडतं !!

या सर्व गोंधळामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीला येतो…. वर्षभरात शेतीसाठी केलेला खर्च आणि शेतमालातून आलेलं उत्पन्न यांचा हिशोब मांडला तर शेतकरी नेहमी तोट्यातच असतो !

ओल्या-सुख्या दुष्काळात शेतकर्‍यांना सरकार मदत पाठवतं खरं पण कित्येक वेळा ही मदत वेळेत मिळत नाही… आणि मिळालीच तर ती अपुरी असते

तरीसुद्धा “ह्या वर्षी चांगलं पिक इल” या इराद्यानं आपला शेतकरी पुन्हा एकदा उभा राहतो !!

पण एखाद्या मोठ्या शहरात गेल्यानंतर…. एकिकडे ए. सी. शॉपमध्ये दिमाखात ठेवलेली चप्पल तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला रणरणत्या उन्हात विकायला ठेवलेली भाजी बघितली की एकच प्रश्न मनात येतो ‘रक्ताचं पाणी करून…. हि भाजी पिकवणारा शेतकरी खरंच “राजा” आहे कि ?

 — गोपाळ शंकर संकपाळ [ भादवण ता.आजरा ]
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular