शेतकरी राजा बळीराजा
तुझा सर्वात उंच दर्जा
तुलाच मिळते सजा
तुझ्यामुळे सर्वांची मजा
तू उघडे राहून
सर्वांना देतो पांघरून
स्वतः मीठ-भाकर खाऊन
दुसऱ्यांना देतो पंचपक्वान्न
पोटात आग आणि डोळ्यांत पाणी
अशी तुझी करुण कहाणी
रक्त आटवूनी, घाम गाळुनी
करतो देशाची उभारणी
तू पिकवितो अनाज
जगतो सारा समाज
कुणी न राहो उपाशी
सर्वांना मिळो सुखराशी…
कवी – श्रीकृष्णा पाटकर
9766887029

समन्वयक – पालघर जिल्हा
नमस्कार -सर
आपली कविता वाचून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आपण सन्मान केलात असंच वाटत आहे.
खूप छान कविता लिहिलीय आपण.
शेतकऱ्यांची व्यथा शब्दांत अतिशय छान पद्धतीने मांडली आहे.
धन्यवाद…!!💐
विजय वैशाली दत्ताराम पराडकर-आण्णा