Homeघडामोडीशेवटी पत्रकाराची काळजी एका पत्रकारालाच

शेवटी पत्रकाराची काळजी एका पत्रकारालाच

आजरा (अमित गुरव ) – पत्रकार हा दिवस रात्र समाजासाठी झडत असतो. त्यांच्या प्रखर लेखणीतून लोकांच्या मनातील खदखद रोखढोक मांडत असतो. ग्रामीण पत्रकारिता करणाऱ्या ना तर तारेवरची कसरत कशी करावी लागते त्याची कल्पना ग्रामीण पत्रकारिता करणाऱ्यांना समजते. बातमी घेण्याच्या दृष्टीने कधीकधी टाकलेल्या पावलामुळे त्यांना शारीरिक, मानसिक इजा होते. त्याची दखल कोणी घेतली किंवा नाही घेतली तरी तो आपला वसा सोडत नाही.
हीच जाण ठेऊन विकास न्यूज चे संपादक विकास सुतार यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आजरा तालुक्यातील सर्व पत्रकारांचा विमा उतरवला. मीटिंग वेळी उपस्थित पत्रकारांच्या समस्या आणि ध्येयधोरणे यावर चर्चा झाली. पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. गुरव अकॅडमी आणि सह्याद्री live च्या वतीने सर्व पत्रकाराना पुस्तके भेट देऊन सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बशीर मुल्ला , सदाशिव मोरे , रणजित कोलेकर , संभाजी जाधव , विकास सुतार , अमित गुरव , सचिन कालेकर , सुभाष पोवार , सुभाष पाटील , पारपोरकर , तसेच इतर पत्रकार उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular