शंभर रुपयांची नोट तशीच संभाळुन ठेवली तर दहा वर्षानीसुद्धा ती शंभर रुपयांचीच असेल, आणि मुल्य ५०% नी घटलेलं असेल…. म्हणजेच आजच्या ५० रुपयांएवढं तीच मुल्य असेल…
पण याच शंभर रुपयांची संपत्ती विकत घेतली तर दहा वर्षानी ती दीड दोन हजार रुपयांची असेल… सोबत दरवर्षी तुम्हाला काहीतरी उत्पन्न देत राहील…
हाती रोख पैसा असणं म्हणजे श्रीमंती नाही… संपत्ती म्हणजे श्रीमंती… संपत्ती निर्माण करणारे श्रीमंत होत असतात…
जमीन विकुन हाती पैसा आला म्हणजे तुम्ही श्रीमंत झालात असे नाही, तर तुम्ही त्या संपत्तीचे फक्त पैशात रुपांतर केले… आता हा पैसा पुन्हा कुठेतरी गुंतवुन वाढवला तर ठीक नाहीतर मोठं घर बांधायचं, गाडी घ्यायची, चौकाचौकात बॅनर बाजी करायची, उगाच मौजमजा करत खर्च करत राहीलात तर काही काळाने तो पैसा संपुनही जाईल… तेच जर तुम्ही त्या जमीनीवर काही व्यवसाय सुरु केला किंवी ती भाड्याने दिली तर ती तुम्हाला परतावाही देईल, सोबत तीचे मुल्य वाढत असल्यामुळे तुमची श्रीमंतीही वाढत जाईल…
यापेक्षाही सोपं उदाहरण पाहू… जगातील सर्वात श्रीमंत जेफ बेझाॅस, बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग किंवा भारतातील मुकेश अंबानी… हे लोक श्रीमंत आहेत म्हणजे काय?? तर यांची गवंतवणुक ज्या कंपन्यांत आहे त्या कंपन्यांचे शेअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत म्हणुन यांची श्रीमंती वाढत आहे… सोबत ही गुंतवणुक त्यांना डिव्हीडंट च्या रुपात वर्षाला करोडो रुपये सुद्धा देते… म्हणजे ही संपत्ती स्वतः वाढतेच सोबत दरवर्षी काहीतरी अतिरीक्त परतावाही देते…
मारवाडी लोक काय करतात?? जमीनी, घरे, फ्लॅट घेणे हे मारवाडी लोकांचे आवडते काम… लहानातील लहान मारवाडी व्यवसायीक किमान काही शे कोटींच्या संपत्तीचा मालक असतो… कारण?? कारण तो आलेला पैसा लगेत जमीनीमधे गुंतवत जातो… किंवा घर फ्लॅट अशा शहरी भागातील प्राॅपर्टी मधे गुंतवुन ठेवतो….
श्रीमंत व्हायचं असेल तर या लोकांना गुरुस्थानी ठेउन त्यांचे गुण अवगत करा…
संपत्तीला महत्व द्या… पैशाला नाही…
संपत्ती जमवली, वाढवली की पैसा आपोआप वाढतो…
संकलन – लिंक मराठी
मुख्यसंपादक