Homeमुक्त- व्यासपीठ!! संविधानात सुरक्षित होइल !!

!! संविधानात सुरक्षित होइल !!

आजची सीता …..
रावण वाचते, रावण जाणते
मुक्तपणे मोकळे कुंदल सोडून
कारण तीला भीती नाही रावण अपहरणाची
स्वतःचा नवरा अग्नी परीक्षेला ढकलण्याची
कारण …..
संविधानात आजची सीता सुरक्षित आहे ……..

आजची द्रौपदी ……
दुर्योधन वाचते, कर्णाला जाणते
मुक्तपणे विहार करते भुलभूलयात
कारण भीती नाही
दुर्योधन कर्णाच्या वस्त्रहरणाची
पती पांडव डावाला लावण्याची
कारण ……….
संविधानात आजची द्रौपदी सुरक्षित आहे …..

आजची राधा …….
कृष्णाला वाचते, कृष्णाला रागवते
मुक्तपणे नदी किनारी फेरफटका मारते
कारण भीती नाही
कृष्णाला वस्त्रे लपवून ठेवण्याची
झाडावर लपून गवळीनिला विवस्त्र बघण्याची
करण ……..
संविधानात गवळीनिची राधा सुरक्षित आहे …….

आजची सावित्री …..
आजची फातीमा ……
आजची रमाई ………
आजची स्त्री संविधानात सुरक्षित आहे
पण कधी ????
जात नावाची जात
आणि हिंदुस्थान नावाचा देश
भारतातून कायम हद्दपार झाल्यावर
भारत माझा देश आहे,
आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत ….
हे जेंव्हा मनामनात रुजेल
तेव्हाच आजची स्त्री
संविधानात सुरक्षित होइल ….
संविधानात सुरक्षित होइल ……
संविधानात सुरक्षित होइल ……

       कवी - बबन सडवेलकर ....
           (8652157338)
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

3 COMMENTS

 1. नमस्कार –
  आजच्या स्त्रीला सक्षम व्हायलाच हवे, आणि आहेच.
  त्यासाठी तिला वाचनाची गोडी जोपासावी लागेल. प्रत्येक स्त्रीने जर एकदा – एकदाच संविधान वाचले तर कधीही कुठेही कोणापुढे हात पसरावे लागणार नाही, इतकी ताकद आहे या संविधानात.

  पण नाही, त्यांना सिरीयल पाहायला वेळ मिळतो पण पुस्तक हातात घेऊन दोन शब्द वाचायला सवड मिळत नाही. हे चित्र ज्यावेळी बदलेल त्यावेळी स्त्रीची खरी ताकद पाहायला मिळेल.
  सर- आपली कविता जी स्त्री वाचेल तिच्यात बदल हा नक्कीच घडेल.

  धन्यवाद
  विजय वैशाली दत्ताराम पराडकर-आण्णा

- Advertisment -spot_img

Most Popular