Homeघडामोडीसरकारी कर्मचाऱ्यांसाठी ४% वाढीव महागाई भत्ता

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ४% वाढीव महागाई भत्ता

नवी दिल्ली : जानेवारी २०२१ पासून केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ निश्चित केली आहे. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता २८ टक्के होईल.  याआधी जुलै २०२० मध्ये महागाई भत्ता ३ टक्के वाढविण्यात आला होता. तसेच त्याआधी जानेवारी २०२० मध्ये त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली होती.  आता जानेवारी २०२१ मध्ये देय असलेली ४ टक्के वाढ झाल्यानंतर एकूण वाढ ११ टक्के होईल. सध्या सरकारने महागाई भत्त्यातील वाढ गोठविलेली आहे. त्यामुळे हा वाढीव भत्ता कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. 
केंद्र सरकारच्या ५० लाख कर्मचाऱ्यांना तसेच ६० लाख निवृत्तांना लाभ होईल. विभिन्न राज्यांच्या कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular